पंढरीवार्ता: तिर्थक्षेत्र पंढरीतील दारुबंदीबाबत आता मंदीर समिती ठराव करणार ? समिती सदस्य आणि सल्लागार मंडळात वारकरी प्रतिनिधींचे वर्चस्व असल्याने अपेक्षा -ह.भ.प.राणा महाराज वासकर मंदीर समितीचे अध्यक्ष अतूल भोसले यांनी पुढाकार घेण्याची गरज.

पंढरीसी जारे आल्याने संसारा । दिनाचा सोयरा पांडुरंग ॥ असे वर्णन आपल्या अभंगातून संतानी केले आहे.या वारकरी संत परंंपरचे पाईक असलेले कोटयावधी भाविक वर्षाकाठी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत येत असतात.पंढरपूर हे भाविकांचे माहेर असल्याने येथे आल्यानंतर येथील प्रसन्न वातावरणात सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर जेव्हा या शहरात फेरफटका मारावयास लागतो तेव्हा मात्र येथे आलेल्या भाविकांचा पुरता भ्रमनिरास होताना दिसून येतो.रस्त्यावर जागोजागी असलेले मांसाहारी पदार्थ विक्रीच्या गाडयाशेजारीच दारुच्या बाटल्या रिकामे करत बसलेले युवक,शहरात अवैध रित्या होत असलेली दारु विक्री आणि चंद्रभागेच्या वाळवंटासह  65 एकर परिसर व शहरातील विविध मैदाने,मोकळ्या जागा या ठिकाणी दारु पित बसलेले टोळके हे द्रश्य येथे नित्याचे झाले आहे.विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या अध्यक्षपदाची धुरा यापुर्वी वै.ह.भ.प.विवेकानंद महाराज वासकर यांनी सांभालळी होती.त्यावेळी त्यांनी पंढरपूर शहरात दारुबंदी व मांसविक्रीबंदी झाली पाहीजे अशी मागणी करीत आंदोलनही केले होते.मात्र पुढे मंदीर समितीवर राजकीय मंडळींचीच वर्णी लागल्याने हा विषय मागे पडला होता.आता मंदीर समितीचे सदस्य व सल्लागार म्हणून बहुतांशी वारकरी सांप्रदायातील अध्वर्यू मंडळींची वर्णी लागल्याने मोहीनी एकादशीच्या निमित्ताने होणार्‍या समिती सदस्यांच्या व सल्लागार मंडळाच्या बैठकीत पंढरपूर तिर्थक्षेत्र हे दारुमुक्त व मांसविक्रीमुक्त झाले पाहीजे असा ठराव करण्यात यावा अशी अपेक्षा वारकरी पाईक संघाचे अध्यक्ष ह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी पंढरी वार्ताशी बोलताना व्यक्त केली आहे.
        तिर्थक्षेत्र पंढरीत दारुबंदी झाली पाहीजे यासाठी यापुर्वी अनेकदा वारकरी संघटनासह विविध सामाजिक संघटनांनी आंदोलने निवेदने दिलेली आहेत.मात्र तरीही याठिकाणी दारुबंदी होऊ शकली नाही.यात्रा कालावधीत दोन-चार दिवस ड्राय डे घोषीत केला जातो मात्र थेट दारु विक्रीच्या अधिकृत दुकानांसमोरच अवैधरित्या दारु विक्री करणारी तरुणांची टोळकी उभा असलेली दिसून येतात तर अवैध हातभट्टी दारुविक्रीस तर ड्राय डे प्रकारच माहीती नाही.त्यामुळे राज्यातून तसेच देशभरातून येथे श्रध्देने आलेल्या भाविकांना येथे आल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी तसेच भररस्त्यावर दारु पित बसलेले टोळके  द्रष्टीस पडतात.देशभरातील अनेक तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी संपुर्ण दारुबंदी असल्याचे दिसून येते.त्यामुळे पंढरीतही दारुबंदी झाली पाहीजे अशी अपेक्षा भाविक व्यक्त करतात.राज्याचे महसुल,उत्पादन शुल्क मंत्रीपदाचा कार्यभार संभाळत असताना पंढरपूर तिर्थक्षेत्रात दारुबंदी झाली पाहीजे यासाठी नगर पालीकेने ठराव करावा आम्ही त्याची तात्काळ अंमलबजावणी करु असे आश्‍वासन त्यांनी दिले होते.मात्र पुढे त्यांना मंत्रीपदावर पायउतार व्हावे लागल्याने हा विषय मागे पडला होता.आता विठ्ठल रुक्मिणी समितीच्या सदस्यपदांसह सल्लागार समितीच्या सदस्यपदी व सल्लगारपदी आता बहुतांश वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या अध्यक्षासह सांप्रदायातील अनेक महाराज मंडळींची नियुक्तीझाल्यानंतर नुतन सदस्य, सल्लगार मंडळाची पहीलीच बैठक होत असून या बैठकीत अपेयपान व अभक्ष भक्षणाच्या मोहातून या तिर्थक्षेत्राची सुटका करण्याच्या उद्देशाने मंदीर समिती ठराव करेल अशी अपेक्षा वारकरी सांप्रदायीक पाईक संघाचे अध्यक्ष ह.भ.प.राणा महाराज वासकर यांनी केली आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव