पंढरी वार्ता :- ‘सिहगड’च्या व्यवस्थापनास शेकडो पालकांच्या सह्यांचे निवेदन ! अन्यायी फी वाढ,शिक्षणाचा ढासळलेला दर्जा यासह अनेक तक्रारींचा पाढा वाचत पालकानी दिला उग्र आंदोलनाचा इशारा ! आदर ऍक्टिीव्हीटीच्या नावाखाली घेतले जाणारे साडेसहा हजार खर्च होतात तरी कशासाठी ?

कोर्टी रस्त्यावरील सिंहगड विद्यालयाच्या मनमानी कारभाविरोधात संघटीत झालेल्या पंढरपूर शहर व तालुक्याती पालकांनी एकत्र येत पालक समितीच्या माध्यमातून आज ‘सिहगड’च्या व्यवस्थापनास निवेदन देवून आपल्या तक्रारींचा पाढा वाचला असून यामध्ये शाळेने पालकांना विश्‍वासात न घेता अचानकपणे व अन्यायीपणे केलेली फी वाढ,येथे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा वरचेवर ढासळत चालला आहे,शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांच्या शारीरीक तपासणीसाठी पुर्णवेळ वैद्यकिय अधिकार्‍याची नियुक्ती करावी,सीबीएसई अभ्यासक्रमाची माहीती प्रथम शिक्षकांनाच आहे का याची खात्री करुन आदी या शिक्षकांना प्रशिक्षीत करावे,क्रिडा शिक्षणावर शाळेने लक्ष द्यावे,एनसीईआरटीचीच अभ्यासक्रमाची पुस्तके वापरावीत,शाळेतूनच वह्या/ पुस्तके घ्यावी लागतात मात्र त्याच्या किमती भरमसाठ ठेवल्या आहेत त्याऐवजी छापील किमतीनुसारच पुस्तके/वह्या उपलब्ध कराव्यात.विद्यार्थ्यांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आरओ सिस्टीम उपलब्ध करावी,आरटीओ नियमाप्रमाणेच स्कुलबस मध्ये विद्यार्थी ने-आण केली जावी,आदर ऍक्टीवीटीच्या नावाखाली घेण्यात येणारी साडेसहा हजारांची रक्कम कुठे खर्च केली जाते याचा खुलासा करावा,हिदी,मराठी हे भाषेचे तास सोडून इतर वेळी इंग्रजी माध्यम असल्याने इंग्रजीचा वापर व्हावा,पालक व स्टाफ मिटींग वेळोवेळी घेण्यात यावी व यामध्ये पालकांनी केलेल्या तक्रारीबाबत त्वरीत उपायोजना करण्यात यावी आदी मागण्यांचे शेकडो पालकांच्या सह्या असलेले निवेदन आज पालक कमेटीच्या वतीने देण्यात आले.
              गेल्या सुमारे एक महिन्याच्या कालावधीपासून कोर्टी रस्त्यावरील सिंहगड पब्लीक स्कुलच्या विरोधात येथे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे पालक संघटीत झाले होते.या बाबत विचारविनियमय करण्यासाठी या पालकांनी दोन वेळा मिटींग घेतली होती.यामध्ये सिंहगड पब्लीक स्कुलच्या व्यवस्थापनास निवदेन देवून आपली तक्रार मांडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.आज वरील आशयाचे निवेदन पालक समितीच्या वतीने देण्यात आले असून या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिक्षणमंत्री विनोद तावडे,पालकमंत्री विजयकुमार देशमुख,जिल्हाधिकारी सोलापूर,जिल्हा शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.या बाबत सिंहगड पब्लीक स्कुलच्या वतीने 1 जून पर्यंत योग्य तो खुलासा व अपेक्षीत निर्णय न घेतल्यास पालकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे व संस्थेच्या वतीने लेखी खुलासा येईपर्यंत पालकांनी फी भरु नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
          फी भरली नसल्यास शाळेला निकाल रोखता येणार नाही
एखाद्या विद्यार्थ्याने शाळेची फी भरली नसेल तर त्या विद्यार्थ्याचा निकाल रोखता येणार नाही. तसे केल्यास ते मुलांच्या शिक्षण हक्क अधिकाराचे उल्लंघन ठरेल, असे महत्त्वपूर्ण निर्देश राज्य बाल हक्क आयोगाने दिले आहेत. या निर्देशाची तातडीने दखल घेत औरंगाबादमधील युनिव्हर्सल या शाळेने मुलीचा रोखून ठेवलेला निकाल दिला.पालकांनी राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली. या प्रकारासंदर्भातील विस्तृत माहिती आयोगाने जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापकांकडे मागितली. ही माहिती मागितल्यानंतर स्पष्टीकरण देताना शाळेला घाम फुटला, त्यांनी रखडवलेला निकाल तात्काळ त्या मुलीला दिला. यानंतर पुन्हा असा प्रकार करणार नाही, असेही स्पष्ट केले.*


Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव