पंढरी वार्ता:- पोलीसांच्या गराडयातील मंत्र्याच्या साक्षीनेच वृत्तांकनासाठी आलेल्या पंढरीतील पत्रकार संघाच्या अध्यक्षांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरटयांनी लांबवीली ! ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंढे यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात चोरटयाची करामत
पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सुनिल उंबरे हे 13 एप्रिल रोजी अरण येथे ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंढे यांच्या प्रमुख उपस्थिीत आयोजीत करण्यात आलेल्या सावता परिषदेच्या वृत्तांकनासाठी गेल्यानंतर या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा बंदोबस्ताठी उपस्थित असताना चोरटयांनी सुनिल उंबरे यांच्या गळ्यातील सोनसाखळी हातोहात लांबवीली असून यामुळे या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड खळबळ उडाली असल्याचे दिसून आले.
या बाबत ज्येष्ठ पत्रकार सुनिल उंबरे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दिली असून अरण येथे सावता परिषदेच्या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी आले असता अज्ञात चोरटयाने उंबरे यांच्या गळ्यातील 23 ग्राम वजनाची सोनसाखळी बेमालूमपणे लंपास केल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
राज्याचे कॅबीनेट दर्जाचे मंत्री कार्यक्रमासाठी उपस्थित असताना व पोलीसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी हजर असताना सराईत चोरटयांनी थेट पत्रकराच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पोलीसांच्या बंदोबस्तावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.