पंढरी वार्ता :- स्वच्छता उपक्रमाबद्दल राष्ट्रवादी ओबीसी सेल कडून मंदीर समितीचे आभार ! समितीच्या चांगल्या कामास जनसामान्यांचा पाठींबा आवश्यक-अनिल सप्ताळ

पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदीर परिसरासह संपुर्ण प्रदक्षिणामार्गाच्या स्वच्छतेसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने घेण्यात आलेला निर्णह अतिशय कौतुकास्पद असून मंदीर समितीच्या चांगल्या उपक्रमास आपण जबाबदार नागिरक म्हणून प्रतिसाद दिल्यास आणखी अनेक चांगले निर्णय समन्वयाने घेतले जावू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.याच बरोबर विभाग प्रमुख,पुजारी,सेवक यांना डे्रसकोड देणे,मंदीर परिसरात शेडनेड उभारणे,सोमेश्‍वर मंदीराभोवती संरक्षण भिंत बांधणे असे अनेक चांगले उपक्रम मंदीर समिती सद्या राबिवित आहे.म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी सेलच्या वतीने आज मंदीर समितीच्या अभिनंदनाचे पत्र आज प्रदान करण्यात आले असल्याची माहीती ओबीसी सेलचे अध्यक्ष अनिल सप्ताळ यांनी दिली आहे.
      या बाबत सा.पंढरी वार्तास अधिक माहीती देताना अनिल सप्ताळ पुढे म्हणाले की,स्थायी मंदीर समितीच्या अध्यक्ष व इतर पदाधिकार्‍यांची निवड झाल्यानंतर समितीच्या वाटचालीस आता खर्‍या अर्थाने स्वयंपुर्णता आली असून पंढरपूरच्या विकासबाबत चर्चा करताना पुर्वी शिर्डी आणि शेगावचे उदाहरण दिले जायचे मंदीर समितीच्या माध्यमातून सद्या अतिशय चांगले प्रकल्प राबवीले जात असून भक्ती मार्गावर उभारण्यात येत असलेले भव्य भक्त निवास हे महाराष्ट्रातील सर्वात आर्कषक भक्त निवास ठरणार आहे.सामाजिक कार्यात काम करीत असताना जीथे उणे तिथे दुषणे दिली जाणे साहजिकच असताना आता समिती करीत असलेल्या चांगल्या कामाचे कौतुक झाले पाहीजे या हेतून आम्ही राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने लवकरच समितीच्या अध्यक्षांसह कार्यकारी अधिकारी व सदस्यांचा लवकरच नागरी सत्कारा सोहळा आयोजीत करणार आहोत.
मंदीर समितीचे प्रशासन अधिकारी श्री वाळूजकर यांना पत्र देताना मनोज आदलींगे,शाहरुख मुलाणी.अजू शेख आदी.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव