पंढरी वार्ता:-पंढरपूर रेल्वे प्रशासनाकडून येथील विविध महत्वपुर्ण समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार- महादेव भालेराव. रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी महादेव भालेराव यांची निवड

पंढरपूर येथे नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी पंढरपूर नगर पालीकेचे नगरसेवक महादेव भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांकडून महादेव भालेराव यांना नुकतेच प्रदान करण्यात आले आहे.
            या बाबत बोलताना नगरसेवक महादेव भालेराव म्हणाले की,पंढरपूरच्या रेल्वे प्रशासनाकडून येथील स्थानिक नागरिकांच्या खुप अपेक्षा आहेत.अनेक समस्या सोडविणे रेल्वेच्या अधिकारात असल्याने रेल्वे प्रशासनाने त्या प्राधान्यक्रमाने सोडवाव्यात अशी नागरिकांची अपेक्षा आहे.सद्या रेल्वे स्थानकाकडून येणारा रेल्वे हद्दीतील रस्ता आहे तो रेल्वे विश्रामगृहापर्यंतच दुहेरी आहे.हा रस्ता पुढे थेट रेल्वे ब्रीज पर्यंत रुंद करण्यात यावा. या ठिकाणी यात्रा कालावधीत,दर महिन्याच्या एकादशीला व रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठया प्रमाणात भाविक रेल्वेने पंढरीत दाखल होतात.रेल्वे स्थानकावरील शौचालयांनी संख्या अपुरी असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा होते,ती दूर करण्यासाठी येथील मोकळ्या जागेत प्रस्तावीत असलेलेल सुलभ शौचालयाच्या इमारतीचे काम तातडीने सुरु करण्यात यावे,जुना कराड नाका येथून रेल्वे थेट प्लॉटफार्मवर जाण्यासाठी ओव्हरब्रीज करण्यात यावा.प्लॅाफॉर्म क्रमांक 2 वर शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय करावी.रेल्वेच्या कराड रोड रस्त्यावरील मोकळ्या जागेत शॉपींग सेंटर बांधून रेल्वेचे उत्पन्न वाढवावे अशा स्वरुपाच्या विधायक कामांसाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहीती यावेळी महादेव भालेराव यंानी दिली.
पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून येणार्‍या भाविकांची संख्या प्रचंड मोठी आहे.येथील रेल्वे प्रशासनाच्या द्रष्टीने भाविकांच्या व प्रवशांच्या सेवेसाठी अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या हेतूने स्थानिक सल्लागार समितीची समितीची स्थापना केली जाते.महादेव भालेराव हे अभ्यासू सामाजिक कार्यकर्ते म्हणून पंढरपूरकरांना परिचीत आहेत.त्यांची या महत्वपुर्ण समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याने रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांच्या अपेक्षांची पुर्तता करण्यासाठी मोठे सहकार्य होणार आहे.महादेव भालेराव यांची या समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याचे समल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव