पंढरी वार्ता:- ग्रामसेवकांसाठी खुशखबर तर ग्रामस्थांची गळचेपी ! आता राष्ट्रीय सणादिवशी ग्रामसभेस परवानगी नाही. ग्रामपंचायतीने ठराव केल्यास ग्रामसभा याच दिवशी घेतली जावी - संजय पाटील घाटणेकर

 राष्ट्रीय सणा दिवशी शासकिय सुटी असल्याने या दिवशी ग्रामसभा न घेण्याची राज्य ग्रामसेवक युनियनने केलेली मागणी राज्य शासनाने मान्य करीत यापुढे गावत या दिवशी ग्रामसभेचे आयोजन करण्यास प्रतिबंध करणारा निर्णय शासनाने घेतला आहे.राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभेत उपस्थित होत असलेल्या विविध वादांच्या विषयामुळे गावातील वातावण कलुषीत होत असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे.त्यामुळे ग्रामसेवकांसाठी ही एक खुशखबर ठरली असली तरी शासनाचा हा निर्णय ग्रामस्थांच्या न्याय्य हक्कावर गदा आणणारा ठरला आहे.

   शासनाच्या या निर्णयाबाबत पंढरी वार्ताशी बोलताना बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर म्हणाले की,वास्तवीक पाहता राष्ट्रीय सणाच्या दिवशी अतिशय उत्साहाने ग्रामस्थ एकत्र येत असतात व गावच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी उत्सुक असतात.या दिवशी आयोजीत ग्रामसभांमध्ये काहीवेळा वादाचे प्रसंग उदभवतात पण त्याचे प्रमणा अतिशय नगण्य आहे.आणि जर ए
खाद्या गावात राजकीय वाद तिव्र असेल तर कुठल्याही दिवशी ग्रामसभा आयोजीत केली तरी वाद हा होत च असतो.मात्र ग्रामसभांकडे सकारात्क द्रष्टीने पाहण्याची गरज असून लोकशाहीने दिलेल्या अधिकारात बहुतांश नागरिक आपले मत मांडत असतात.असे असताना शासनाने हा निर्णय घेतला असून यास आपला आक्षेप आहे. 

राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे दि. 26 जानेवारी वगळता इतर राष्ट्रीय व राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या तारखेला नियमित ग्रामसभा आयोजित करण्यात येणार नाही. मात्र, अशा तारखेला ध्वजवंदन, सांस्कृतिक कार्यक्रम, राज्य शासनाचे काही संदेश किंवा प्रबोधन द्यायचे असल्यास, अशा संदेशाचे वाचन व प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मात्र, असे संदेश ग्रामसभेमार्फत द्यायचे असल्यास संबंधित इतर प्रशासकीय विभागांनी ते ग्रामविकास विभागाकडे पाठवायचे आहेत, त्यानंतर ग्रामविकास विभागाकडून तशा सूचना जिल्हा परिषदेला देण्यात येतील. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमनातील कलम 7 नुसार मे, ऑगस्ट, नोव्हेंबर या तीन महिन्यात व 26 जानेवारी रोजी अशा चार ग्रामसभांचे आयोजन करण्यात येईल. या व्यतिरीक्त ग्रामसभा घ्यायची असल्यास याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठवून परवानगी घ्यावी लागणार आहे. जिल्हा परिषदेलाही ग्रामसभा आयोजित करण्यापूर्वी ग्रामविकास विभागाची मान्यता घ्यावी लागणार आहे.
राष्ट्रीय सणाच्या दिवशी प्रत्येक भारतीय व्यक्ती आनंद उत्सव साजरा करते. परंतु, याच दिवशी ग्रामसभा असल्याने ऐकमेकांची राजकीय उनी दुनी चुकती करण्याची राजकीय प्रवृत्ती बाळवत होती. यामुळे राष्ट्रीय सणाच्या दिवशी होणार्‍या ग्रामसभा राजकीय आखाडा झाल्या होत्या तसेच अशा प्रसंगी ग्रामसेवकांच्या जिवावर बेतणार्‍या घटनाही घडत होत्या. या सर्व प्रकाराने ग्रामसेवकांचे स्वास्थ लोप पावत चालले  होते असे कारण पुढे करीत शासनाने हा निर्णय घेतला आहे.  

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव