पंढरी वार्ता:- पंढरीतील ‘हिस्ट्रीशिटर’च्या मालमत्ता धोक्यात ! पोलीस खात्याच्या अहवालाची प्रतिक्षा तर आयकर विभागाच्या कारवाईचीही शक्यता ?

समतेचा संदेश देणार्‍या संताचे,भाविकांचे माहेरघर म्हणून ओळखल्या गेलेल्या पंढरी नगरीस 1967 साली अस्तित्वात आलेल्या गोल्डन गँग पासून जो गुन्हेगारीचा कलंक लागला तो आजतागायत पुसता आला नाही.1967 पुर्वीचा पंढरपूरचा इतिहास धुंडाळून पाहीला असता पंढरपूरात गुन्हेगारी जगत अस्तित्वातच नव्हते,त्या काळी दादा,नाना,आण्णा,भाऊ अस्तित्वात होते पण ते कुटुंब प्रमुखाप्रमाणे सार्‍या पंढरपूरची काळजी घेत होते इतिहास आहेे.पुर्वी पंढरीच्या राजकारणाची सुत्रे ही या शहराच्या व्यापारी वर्गाच्या हाती होती.बाबुराव म्हमाणे म्हणजे तर या शहराचे चालते-फिरते न्यायालयच होते.ते जो निर्णय देतील तो या शहरात आदराने मान्य केला जात होता.त्यामुळे या शहराच्या राजकारणात कधीही गुंडगीरीस थारा नव्हता.बाबुराव जोशी,बबनराव बडवे,बाबुराव म्हमाणे,शिवप्पा भिंगे,देवदीस भिंगे आदी ज्येष्ठ नेत्यांच्या विचारांवर श्रध्दा ठेवत या शहराची राजकीय वाटचाल होत होती.
     पंढरपूरातील प्रख्यात अरुण टॉकीजच्या मालकाचा 1967 मध्ये खुन झाला आणि या शहरास दहशतीच्या वातावरणाचा पही ला  अनुभव आला.या खुन प्रकरणातून पुढे अस्तित्वात आलेल्या गोल्डन गँगचा दबदबा पंढरपूरात वाढत गेला पण या गँगच्या म्होरकर्‍याची त्याकाळी जरी दहशत होती तरी त्यांना राजकीय पाठबळ कधीही मिळू शकले नाही.आणि यासाठी सर्वात प्रभावशाली भूमिका बजावली होती ती या शहरातील व्यापार पेठेतील सोज्वळ नेत्यांनी.आणि त्यांनीच पुढे आणले ते कै.औदुंबरआण्णा पाटील यांचे नेतृत्वही या शहराने एक आडत दुकानदार म्हणुनच मान्य केले होते.मात्र पुढे स्व.आण्णांनी या तालुक्यात हरितक्रांती घडवून या तालुक्यास सोन्याचे दिवस दाखवीले.
        मात्र 1988 नंतर या शहराचे राजकाणात गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव वाढला.सुरुवातीस या शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी अशा दहशतवादी प्रवुत्तींचा राजकारण प्रवेश रोखण्यास प्रतिसाद दिला मात्र पैशातून सत्ता आणि पुन्हा सत्तेच्या बळावर पैसा हे सुत्र समजलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीनी अंगात पांढरे डगले चढवून आणखी वेगाने मालमत्ता गोळा करता येतात हे जाणून आपले हातपाय पसरण्यास सुरवात केली होती.आणि यातूनच राजकीय वर्चस्वाच्या लढाईत अशा गन्हेगारी प्रवृत्तींचा योग्य वापर केला तर संबधीत वार्डावर,प्रभागावर आपल्या हातचे बाहुले असलेल्या गुंड प्रवृत्तींचा खूप मोठा फायदा होतो,अट फक्त एकच निवडणुकीत त्यांनी लिड द्यायचे आणि उरलेले 58 महिने नेत्याने त्यांच्या अन्याय अत्याचाराकडे दुर्लक्ष करायचे असे जणू समिकरणच झाले होते.
    मात्र आता तो काळ राहीला नसून सोशल मिडीया व कायद्याचे ज्ञान आणि संघर्षाचे भान असलेली नवी पिढी अशा दहशतीच्या राजकाणाचा सुत्रधार कोण असतात हे ओळखून चुकली आहे.म्हणूनच शहरात कुठेही अन्याय अत्याचाराची घटना घडली की त्याचे पडसाद थेट सोशल मिडीयावर उमटण्यास सुरवात होते.आणि या पडसादाची दखल घेणे पोलीस खात्यासह शहरावरील राजकीय वर्चस्व अबाधीत ठेवण्यासाठी व्युहरचना करीत असलेल्या नेत्यांना भाग पडते. त्यांना जनतेची नाराजी लक्षात घेवून कठोर पावले उचलावी लागत आहेत. यातूनच पंढरपूर शहरातील गुन्हेगारीची चर्चा आता थेट मंत्रालयात होऊ लागली असून त्यामुळे पंढरपूर शहरातील गुन्हेगारी वर्तुळात सक्रिय असलेल्या प्रवृत्तींचा बिमोड करण्याचे आदेश थेट मंत्रालयातूनच निघाले असल्याची चर्चा आहे.व त्यासाठी शहरातील ‘हिस्ट्रीशिटर’ वर विविध मार्गाने कारवाई करण्याबरोबरच गेल्या वीस वर्षाच्या कालावधीत अशा ‘हिस्ट्रीशिटर’गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता, कायदेशीर उत्पन्नाची साधने व कायदेशीर ज्ञात उत्पन्नापेक्षा जमा केलेल्या मालमत्ता यांचा शोध घेण्यासाठी पोलीस व महसूल खात्याबरोबरच आयकर विभागाचे सहकार्य घेवून भविष्यात मोठया कारवाया केल्या जाणार असल्याची माहीती पंढरी वार्तास विश्‍वासनिय सुत्रांकडून मिळाली आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव