पंढरी वार्ता :- गजानन महाराज संस्थेविरोधातील एल्गार सभेस शेगावकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद ! श्रध्देच्या नावाखालील दुकानदारी थांबविण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिक संघटीत
शेगाव येथील गजानन महाराज संस्थान हे केवळ अर्थिक हित डोळ्यासमोर ठेवून कार्यरत आहे.या संस्थानाला स्थानिक जनतेच्या हिताशी काहीही देणे घेणे नाही त्यामुळे या संस्थेच्या विरोधात शेगाव येथील जनभावना प्रक्षुब्ध असतानाच या संस्थेच्या कारभाराबाबत जनजागृती व स्थानिक जनतेच्या भावनेस वाट मोकळी करुन देण्यासाठी शेगाव येथे आयोजीत सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या संस्थेच्या लोकहितविरोधी व केवळ अर्थकारण डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत असलेल्या कारभाराबाबत आपली प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
भक्तांच्या सोयीसाठी शासनाने विकास आराखडा आणून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक शेगांव शहरामध्ये केली, पर्यटन वाढून स्थानिक रोजगार निर्माण व्हावा हा उद्देश त्यामागे होता.मात्र गजानन महाराज संस्थान हे केवळ अर्थिक फायदाच डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत आहे.येथे या संस्थानने ज्या काही सुविधा व विकास केला आहे तो केवळ अधिक अर्थिक फायदा डोळ्यासमोर ठेवूनच केला आहे अशी टिका यासभेत करण्यात आली.कोटयावधी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेला मुख्य दरवाजा बंद असल्याने या मंदीर परिसरातील नागरिकांच्या पोटावर पाय देण्याचे पाप जाणीवपुर्वक व हेकेखोर वृत्तीने या संस्थेकडून केले जात आहे,आनंद सागर,भक्त निवास आणि इतर देणगी स्वरुपात संस्थेकडुन केवळ अर्थिक हित डोळयासमोर ठेवूनच विविध निर्णय घेण्यात येतात अशी टिकाही यावेळी करण्यात आली.
शेगांव शहराची खरी शान असणारा श्रीरामनावमी यात्रा महोत्सव नामशेष झाला, हा यात्रा महोत्सव हजारो व्यावसायिकांचे तसेच लाखो ग्राहकांचे आकर्षणाच्या केंद्रस्थानी होता. हजारो लोकांना रोजगार देणारा व लाखोंची उलाढाल असणारा हा यात्रा महोत्सव गेल्या दोन वर्षांपासून लोप पावत आहे,शेगांव शहरात दिवसों दिवस रोजगाराच्या संधी लोप पावत आहेत, शेगांवातील स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. हे महोत्सव कोणी बंद पाडले ? , शेगांव शहराला बेरोजगारीकडे कोण लोटत आहे ? शेगांवातील व्यावसायिक कोणामुळे त्रस्त आहेत ? असा सवाल या सभेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला.
पंढरपूर शहरातही गजानन महाराज मठ संस्थेचा लॉजींगचा व्यवसाय सद्या भलताच तेजीत आहे.या संस्थेच्या आवारातील सर्वच इमारती या व्यवसायीक दृष्टीकोण समोर ठेवूनच बांधण्यात आलेल्या आहेत.येथे भाविकांच्या निवासासाठी उपलब्ध असलेल्या एकुण रुम व आणि या ठिकाणी उपलब्ध असलेली पार्कींग व्यवस्था याचे प्रमाण व्यस्त असल्याचे दिसून येते.त्यामुळेच या ठिकाणी निवासासाठी आलेल्या भाविकांची वाहने रस्त्यावर पार्क करावी लागतात.तर पंढरपूरातील मठाच्या माध्यमातून येथील स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्याबाबत येथील व्यवस्थापनाची नकारात्मक भुमिका असल्याचे दिसून येते.या मठाचे उत्पन्न हे विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या उत्पन्नाशी स्पर्धा करीत असताना या शहराच्या विकासात या संस्थेचे योगदान शुन्य असल्यानेच पंढरपूरातही या संस्थेच्या कारभाराबाबत नाराजी वाढत आहे.