पंढरी वार्ता:- वारकरी साहित्य परिषद सोमवार पासून मोफत स्वच्छता सेवेचे रस्ते बदलणार ! संत कैकाडी महाराज मठ,संत तनुपरे महाराज मठ,गोपाळपूर मंदीर परिसर,पंढरीतील विविध प्रमुख मठांच्या परिसरात केली जाणार मोफत सेवा.

पंढरीत वारकरी साहित्यपरिषदेच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले स्वच्छता सेवक मंदीर परिसर,प्रदक्षिणा मार्ग,वाळवंट आदीसह मुख्य रस्त्यावर स्वच्छता करीत असलेले दृश्य गेल्या दोन महिन्यापासून या भागात पहावयास मिळत होते.या भागातील व्यापारी,मठाधिपती,सर्वसामान्य नागरिक वारकरी साहित्य परिषदेचे सेवाधारी करीत असलेले स्वच्छतेचे काम पाहून समाधान व्यक्त करीत होते.मात्र आता मंदीर समितीने हेच काम करण्यासाठी दिड कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करत ठेकेदाराची नियुक्ती केली असून त्यामुळे वारकरी साहित्य परिषदेला नाईलाजास्तव समितीच्या टेंडरमध्ये नमूद करण्यात आलेल्या परिससरातील काम थांबवावे लागणार आहे.
        या बाबत पंढरी वार्ताशी बोलताना वारकरी साहित्य परिषदेचे पंढरपूर येथील समन्वयक अनिल हजारे म्हणाले की,आम्ही सेवाभावी वृत्तीने मंदीर समितीस अथवा नगर परिषदेस कुठलाही अर्थिक भार न टाकता ही सेवा बजावणार होतो.आता मंदीर समितीने मंदीर परिसर,चौफाळा ते महाद्वार,संपुर्ण प्रदक्षिणा मार्ग,वाळवंट परिसराच्या स्वच्छतेचे टेंडर काढून ठेकेदाची नियुक्ती करुन दिड कोटीचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.असे असताना आम्ही याच भागात सेवा बजावणे सांयुक्तीक होणार नाही म्हणून आम्ही नाईलाजाने शहरातील इतर प्रमुख मठ,मंदीरे,भाविकांची वर्दळ असणारी ठिकाणे अशा ठिकाणी साहित्य परिषदेच्या सेवकांमार्फत स्वच्छतेची सेवा बजावणार आहोत.    

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव