पंढरीवार्ता: मंदीर समितीच्या टेंडरनंतर वारकरी साहित्य परिषदेची पंढरीतील स्वच्छता सेवा थंडावली. साहित्य परिषदेच्या सेवकांचा पंढरीत सत्कार.

वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने गेल्या दोन महिन्यापुर्वी सुरु करण्यात आलेली स्वच्छता सेवा आता थांबविण्यात आली असून मंदीर परिसर,प्रदक्षिणा रस्ता,वाळवंट आदी भागातील स्वच्छतेच्या कामासाठी मंदीर समितीने निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर 15 एप्रिल पासून सदर ठेकेदाराकडून या परिसराची स्वच्छता केली जात आहे.त्यामुळे साहित्य परिषदेच्या वतीने शहरातील इतर प्रमुख मठ,मंदीरे व बस्थानक परिसरात मोफत स्वच्छता केली जाईल अशी माहीती साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली होती.मात्र या परिसरात नगर पालीकेचे कर्मचारी स्वच्छता करीत आहेत तर बसस्थानक परिसराच्या स्वच्छतेसाठी ठेकेदाराची नियुक्ती यापुर्वीच करण्यात आली आहे.त्यामुळे वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात येणारी स्वच्छतासेवा सद्या तरी थंडावली आहे.
        वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या स्वच्छता सेवेत सहभागी झालेल्या सफाई कर्मचार्‍यांचा नगरसेवक महादेव भालेराव यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेवक महादेव धोत्रे,नगरसेवक डि.राज सर्वगोड,मा.नगरसेवक महेश साठे,सुनिल वाघमारे,श्री हजारे आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव