पंढरीवार्ता: Rte ऍडमिशनच्या पहील्याच फेरीत 58 पैकी 14 शाळांमध्ये केवळ 41 विद्यार्थ्यांना प्रवेश ! 461 पैकी 420 जागा रिक्त,दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत अनेक शाळा उदासीन वाखरीच्या त्या बडया शिक्षण संस्थेस नोटीस.
शिक्षण हक्क कायद्यानुसार पंढरपूर शहर व तालुक्यातील 58 शाळांची नोंदणी करण्यात आली होती.मात्र पहील्या फेरीअखेर 461 पैकी केवळ 41 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून 420 जागा अजुनही रिक्त आहेत.तर वाखरी येथील एका बडया शिक्षण संस्थेस शिक्षण हक्क कायद्याचा भंग करीत असल्याबाबतची नोटीस काढण्यात आली आहे.अर्थिक द्रष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी बडया शिक्षण संस्थांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे.व शासनाच्या नियमाप्रमाणे या जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवीण्यात येत आहे.याचा पहीला टप्पा नुकताच पुर्ण झाला असून यामध्ये केवळ 41 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.एकीकडे याच खाजगी शाळांंमध्ये आपल्या पाल्यास प्रवेश मिळावा म्हणून खुल्या प्रवर्गातील प्रवेशअर्जासाठी पहाटेपासून पालक रांगा लावून थांबत असल्याचे दिसून आले होते.असे असताना याच शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश देताना मात्र ही प्रवेश प्रक्रिया इतकी रेंगाळण्यामागचे गौडबंगाल काय ? असाच प्रश्न आता पालकवर्गाकडून विचारला जात आहे.
शिक्षण ह्क्क कायद्याअर्तंगत प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची फी शासनाकडून शाळेकडे वर्ग केली जाते.ही प्रवेश प्रक्रिया राबवीताना शासनाकडून वेळेवर फी मिळत नसल्याचा आरोप अनेक शिक्षण संस्थांकडून केला जातो.त्यामुळे यंदा या प्रवेश प्रक्रियेतील हा मुख्य अडथळा दूर करण्यासाठी 2016-17 पर्यंतचा 60 लाख 60 हजार 279 रुपयांचा निधी या शाळांकडे तातडीने वर्ग करण्यात आल्याचे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोढ यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.त्याच बरोबर ज्या शाळा आरटीई नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबविणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता.या बाबत जिल्ह्यातील 40 शिक्षणसंस्था चालकांना नोटीसा बजाण्यात आल्या असून त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील एका बडया शिक्षण संस्थेचा समावेश आहे.