पंढरी वार्ता:-मोहोळ मतदार संघात समाविष्ट 17 गावातील कार्यकर्त्यांची 13 मे रोजी पंढरीत बैठक जि.प.सदस्य बाळराजे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार -संकेत ढवळे
मोहोळ मतदार संघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील 17 गावातील कार्यकर्त्यांच्या व पदाधिकार्यांच्या बैठकीचे रविवार दिनांक 13 मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. जि.प.सदस्य बाळराजे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसचे विविध पदाधिकारी या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेणार आहेत अशी माहीती राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे यांनी दिली आहे.
या बाबत अधिक माहीती देताना संकेत ढवळे म्हणाले की,जि.प.सदस्य बाळराजे पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील 17 गावांमध्ये संंवाद बैठकांचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले आहे.या बाबत विचार विनिमय करण्यासाठी पंढरीत 13 मे रोजी विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीस राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील,जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील,मतदार संघ अध्यक्ष दिपक वाडदेकर,तालुकाध्यक्ष ऍड.दिपक पवार,तालुका कार्याध्यक्ष हनुमंत पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.या बैठकीनंतर जि.प.सदस्य बाळराजे पाटील हे या 17 गावचा झंजावाती दौरा करुन स्थानिक कार्यकर्त्यांशी व मतदारांशी संपर्क साधणार असल्याची माहीती संकेत ढवळे यांनी दिली आहे.