पंढरी वार्ता:- जेथे सत्ता संपादनाचा निर्धार, तेथेच ‘दमदार’ उमेदवार देण्याचे भारिप बहुजन महासंघासमोर आव्हान ! 2019 च्या विधानसभा निवडणूकीत निणार्यक तिसरा उमेदवार कोण ? याच्या चर्चेला सुरुवात.
भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी पार पडलेल्या धनगर समाज सत्ता संपादन निर्धार मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यातील विशेषत: पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील धनगर समाज बांधवांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.भारत हा देश हा घटनात्मक द्रष्टया धर्मनिरपेक्ष असला तरी व महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी म्हणून ओळखले जात असले तरी या राज्यातील प्रत्येक निवडणुकीत जात हा महत्वाचा फॅॅक्टर म्हणून ओळखला जातो.विधानसभा अथवा लोकसभा निवडणूकाच काय तर अगदी नगर पालीका अथवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकात देखील त्या संबधीत प्रभागातील,वार्डातील जातींच्या मतदारांची संख्या विचारात घेवून उमेदवार निश्चित केले जातात.राज्यात 2014 मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर मोठया प्रमाणात जातीय धृवीकरण होताना दिसत आले असून एकीकडे मराठा समाजातील अर्थिक द्रष्टया दुर्बल घटक मराठा समाजास आरक्षणाची मागणी करीत आहे तर धनगर समाज इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही धनगर समाजास अनुसुचीत जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष करीत आहे.15 वर्षाच्या सत्ताकाळात कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉगेे्रसने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने 2014 च्या निवडणुकीत मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या भुलथापांना बळी पडत धनगर समाजाने भाजपाची पाठराखण केली.मात्र आता या समाजाचा पुरता भ्रमनिरास झाला असून कॉग्रेस-राष्ट्रवादी प्रमाणेच भाजपाही आपल्या आरक्षणाच्या मागणीस न्याय देवू शकणार नाही अशी धारणा या समाजाची झालेली आहे.त्यामुळे तिसरा सक्षम पर्याय म्हणून धनगर समाजाने आता ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आपला लढा सुुर ठेवण्याबरोबरच सत्ता संपादन करुन समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आपणच सत्ता हाती घेवून सोडवू असा निर्धार पंढरपूर येथील सत्ता संपादन निर्धार मेळाव्यात केला आहे. या मेळाव्यास मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता धनगर समाज व भारिप समर्थक आंबेडकरी समाज एकत्र येवून निश्चितच नव्या राजकीय पर्वाचा शुभारंभ करतील असा विश्वास व्यक्त केला गेला असला तरी ज्या ठिकाणी डॉ.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने सत्ता संपादनाचा निर्धार केला त्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात सक्षम आणि दमदार उमेदवार देण्याचे मोठे आव्हान भारिप बहुजन महासंघास स्विकारावे लागणार आहे.
ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुर येथे मेळावा घेवून सत्ता संपादनाचा एल्गार केला खरा पण सोलापूर लोकसभा मतदार संघात निर्णायक भुमिका बजावत आलेला व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत सक्षम तिसरा पर्याय देण्याचे आव्हान भारिप बहुजन महासंघ पेलणार काय ? याचीच चर्चा या मेळाव्याच्या निमित्ताने होताना दिसून येत आहे.
ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुर येथे मेळावा घेवून सत्ता संपादनाचा एल्गार केला खरा पण सोलापूर लोकसभा मतदार संघात निर्णायक भुमिका बजावत आलेला व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत सक्षम तिसरा पर्याय देण्याचे आव्हान भारिप बहुजन महासंघ पेलणार काय ? याचीच चर्चा या मेळाव्याच्या निमित्ताने होताना दिसून येत आहे.
