पंढरी वार्ता:- आधी जाहीर केलेली 3 रुपये दुध दरवाढ द्या, मग दुधभुकटीच्या अनुदानाबद्दल पाठ थोपटून घ्या ! -संजय पाटील घाटणेकर राज्यातील सहकारी व खाजगी दुध संघ कुठल्या राजकीय पक्षाची संबधीत आहेत हे आधी तपासून पहा !
राज्य शासनाने दुध उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी नव्हे तर केवळ स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी दुधभुकटीस तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला असून या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा शेतकर्यांना होणार नसून तो दुध भुकटीचे उत्पादन करणार्या सहकारी व खाजगी दुध संघांना होणार आहे.20 जुन रोजी दुग्धविकास मंत्री महादेव जाणकर यांनी दुध उत्पादकांना 3 रुपये दरवाढ देण्याची घोषणा केली मात्र त्याची अंमलबजावणी आजतागाय राज्यातील कुठल्याही खाजगी अथवा सहकारी दुध उत्पादक संकलन व प्रक्रिया संघाने केली नाही.तरीही गेली दहा महिने शासन याबाबत मौन बाळगून असतानाच आता केवळ दुग्ध उत्पादक शेतकर्यांसाठी आपण काहीतरी करीत आहोत या दर्शविण्यासाठीच आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत दुधभुकटीस 3 रुपये प्रतिकीलो अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या या निर्णयाचा लाभ सामान्य दुध उत्पादक शेतकर्यांना काडीमात्र होणार नाही.सरकारमध्ये धमक असेल तर सहकारी व खाजगी दुध संघाना जून मध्ये जाहीर केल्या प्रमाणे दूध दरवाढ लागू करुन पुर्वलक्षी प्रमाणे शेतकर्यांना त्याची बीले अदा करण्यात यावीत अशी प्रतिक्रिया बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर यांनी पंढरी वार्ताशी बोलताना व्यक्त केली आहे.
देशातील दूध पावडर लोण्याच्या साठ्यामध्ये भरमसाट वाढ होत आहे. देशात सध्या तीन लाख टन दूध भुकटी विक्रीअभावी पडून आहे. लोण्याचे साठेदेखील एक लाख टनाच्या आसपास पोचलेले आहेत. दूध पावडर (भुकटी) व बटरचा (लोणी) साठा विकून डेअरी उद्योगाकडे पुरेसा पैसा येत नाही तोपर्यंत दुधाचे दर शेतकर्यांना वाढवून मिळण्याची शक्यता वाटत नाही,’’ असे दुग्धप्रक्रिया उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यात खासगी दुधाच्या बाजारपेठेवरील घडामोडींवर सहकारी दूध संघांचे दर ठरतात. शासनाने प्रतिलिटर 27 रुपये दर शेतकर्यांना देण्याचे बंधन घातले असले तरी सध्या खासगी व सहकारी संघांकडून दुधाला 18 ते 24 रुपये दर दिला जात आहे.राज्यात दुधाचे संकलन दरदिवशी सव्वा कोटी लिटरच्या आसपास होते. पण मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यात दुधाची विक्री दोन कोटी 30 लाख लिटरच्या आसपास होते असा ढोबळ अंदाज आहे. याचाच अर्थ दूध संकलन कमी पण विक्री जास्त आहे. शेजारच्या गुजरातमधून अमूलचे 25 लाख लिटरपेक्षा जास्त दूध येत असावे असा अंदाज आहे. कर्नाटकातूनही दूध येते. राज्यात साडेतीनशेहून अधिक खाजगी डेअरीचे ब्रँड आहेत. यात दोन्ही कॉंग्रेसच्या पुढार्यांच्या जास्त डेअरी आहेत.दूध उत्पादक शेतकर्यांचे हित जपण्यासाठी कर्नाटकाच्या धर्तीवर प्रति लीटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात यावे, राज्यात शालेय पोषण आहार योजनेत शाळकरी मुलांना सकस ताजे दूध देण्यात यावे अशी मागणीही यावेळी संजय पाटील घाटणेकर यांनी केली आहे.शासनाने जाहीर केलेल्या दुधदर दरवाढीच्या घोषणेबाबत आधी धमक असेल तर कारवाई करावी,शासनाचा हमी दर न देणार्यांवर गुन्हे दाखल करावेत मगच आपली पाठ थोपटून घ्यावी अशी प्रतिक्रिया यावेळी संजय पाटील घाटणेकर यांनी व्यक्त केली.