पंढरी वार्ता:- 3 जून रोजी पंढरीत धनगर समाजाचा वधू-वर मेळावा. धनगर समाजातील वधू-वर व पालकांनी उपस्थित राहण्याचे संयोजकांचे आवाहन

पंढरपूर धनगर समाज वधु वर सुचक मंडळाच्या वतीने रविवार  3 जून  2018 रोजी  संत फरताळे दिंडी क्रमांक  9 भक्ती मार्ग पंढरपूर मध्ये  सकाळी  10 ते  5 वाजेपर्यंत वधु वर मेळावाच्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्याहस्ते होणार असुन  डी सी सी बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख,फॅबटेकचेे चेअरमन भाऊसाहेब रूपनर,बाळासाहेब गडदे पाटील, पंचायत समितीचे मा.सभापती वामनराव माने,विठ्ठल नाना पाटील,निर्मला पाटील, डॉ एम आर टकले, डॉ श्रीकांत देवकते,डॉ सुनिल कारंडे,श्रीधर कारंडे,दिपक येळे,आझाद अल्लापूरकर,ऍड.महेश काळे,विजय माने,महादेव वाघमोडे आदींसह समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.
       या कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पंढरपूर धनगर समाज वधु वर सुचक मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ भिसे यांनी केले आहे .अधिक माहितीसाठी 9766249191 या मोबा.नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव