पंढरी वार्ता :-विस्थापीत नगरातील अर्तंगत रस्ते खडीकरण व डांबरीकरणासाठी 71.92 लाखांचा निधी उपलब्ध ! नगरसेविका रेणुका घोडके यांच्या पाठपुराव्यास यश .
पंढरपूर शहरातील विस्थापीत नगर येथील अर्तंगत रस्त्यांच्या कामासाठी पंढरपूर नगर पालीकेकडून 71.92 लाख रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली असून या कामास लवकरच सुरुवात होणार आहे.विस्थापीत नगरातील रहिवाशांना पावसाळ्याच्या कालवधीत अर्तंगत रस्त्यांवर चिखल होत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत होता.या बाबत नगरसेविका रेणुका धर्मराज घोडके यांनी आ.प्रशांत परिचारक व नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्याकडे येथील रस्त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी केली होती.या मागणीची तात्काळ दखल घेत या कामाच्या निविदा प्रक्रियेस सुरवात झाली असून पावसाळयापुर्वी येथील रस्त्यांची कामे पुर्ण होतील अशी अपेक्षा आहे.
या बाबत अधिक माहीती देताना नगरसेविका रेणुका घोडके म्हणाल्या की,विस्थापीत नगर येथील ओपनस्पेसच्या ठिकाणी पावसाळ्यापुर्वी लोकसहभागातून वृक्षारोपन करण्यात येणार असून त्याच बरोबर या ठिकाणी जमीन समतल करुन लहान मुलांच्या खेळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
