पंढरी वार्ता:- तुळशी वृंदावनाच्या कामाची वनआयुक्त खांडेकर यांनी केली पाहणी ! आठ संताची मंदीरे,संगीत कारंजे कामांची 76 लाख रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया सुरु ! पर्यावरण खात्याच्या नियमानुसार वनआयुक्तांचा बायोटॉयलेटसाठी आग्रह ?
यमाई तलावाच्या ठिकाणी नमामी चंद्रभागे योजनेअर्तंगत सुरु असलेल्या तुळशी वृंदावनाच्या विविध कामांची विभागीय वनआयुक्त वि.म.खांडेकर यांनी आज भेट देवून पाहणी केली असून त्यांच्या समवेत सह.वनअधिकारी हरिश्चंद्र खांडेकर,वनसंरक्षक संजय माळी,उपविगागीय वनअधिकारी श्री कुलकर्णी आदी यांच्यासह वनविभागातील अनेक सह.अधिकारी उपस्थित होते.
नमामी चंद्रभागे योजनेचा मोठा गाजावाजा करीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी तुळशीचे रोपटे लावून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता.पुढे दोन वर्षे हे काम रखडलेले होते.मात्र त्यानंतर अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी येथील तुळशीवनाच्या कामासाठी तातडीने साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजुर केला होता.नोव्हेंबर 2017 पासून रिटेनींग वॉल,कंपाउंड वॉल व डाव्या बाजुची संरक्षक भींत आदी कामांच्य निविदा प्रक्रियेस सुरुवात झाली तर डिसेंबर 2017 पासून प्रत्यक्षात कामास सुरुवातही झाली होती.सुरुवातीच्या काळात या कामास पंढरपूरकरांमधून प्रचंड विरोध झाला होता.
सद्या हे काम वेगाने पुर्ण केले जात असून आज वनआयुक्तांनी पंढरीत येवून या कामाची पाहणी केली असून या ठिकाणी आठ प्रमुख संताची संगमरवरी मंदीरे बाधण्यात येत आहेत. त्याच बरोबर येथे आकर्षक लॅन्डस्केप गार्डन व संगीत कारंजेही करण्यात येणार आहेत.यमाई तलावाच्या मुळ आरखडयास मंजुरी देताना पर्यावरण विभागाने अनेक नियम व अटी घातल्या होत्या.या ठिकानी स्थायी स्वरुपाचे बांधकाम करु नये याच बरोबर येथे उभारण्यात येणारी स्वच्छता गृहे ही पर्यावरण पुरक असावीत अशीही अट घालण्यात आली होती.मात्र या तुळशी वनाच्या ठिकाणी स्थायी स्वरुपाची स्वच्छता गृहे उभाण्यात येत असून याबाबत वनआयुक्तांनीही बायोटॉयलेटच उभारण्यात यावीत अशा सुचना दिल्याची माहीती विश्वासनिय सुत्रांकडून मिळाली आहे.सद्य स्थितीत तुळशी वनाच्या ठिकाणी आठ संताच्या मंदीराचे कामही सुरु असल्याचे निदर्शनास येत असले तरी या कामांची निविदा दाखल करण्याची अंतीम मुदत 11 मे 2018 ही होती.मात्र तरीही या आठ मंदीरांचे काम सद्या प्रगतीप्रथावर असून निविदा प्रक्रियेची मुदत संपण्यापुर्वीच कसे काय केले जात आहे ? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.