पंढरी वार्ता:- जि.प.सदस्य बाळराजेंच्या पंढरीतील पहील्याच बैठकीनंतर भीमा व लोकशक्ती परिवारही विधानसभेसाठी सक्रिय ? मतदार संघ पुनर्रचनेनंतर 8 वर्षात पहिल्यांदाच बाळराजेंची पंढरीत बैठक ! 17 गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपेक्षा नेहमीच्या समर्थकांचीच बैठकीला गर्दी ?
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष,जि.प.सदस्य बाळराजे पाटील यांनी शनिवारी मोहोळ मतदार संघात समाविष्ट असलेेल्या पंढरपूर तालुकयातील 17 गावच्या राष्ट्रवादीच्या मतदार संघ पुनर्ररचने नंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांची बैठक घेतली असून बैठक घेत पंढरपूर तालुका राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बुचकाळ्यात पाडले असले तरी या बैठकीस राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी वगळता बाळराजे पाटील यांच्या नेहमीच्या समर्थकांचीच गर्दी होती अशी चर्चा आता पंढरपूर तालुक्यातील ‘त्या’ 17 गावात होत असून गेल्या आठ वर्षात कधी आमची आठवण झाली नाही आताच बैठकीचा फार्स कशासाठी अशीही प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अनेक समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.
मोहोळ विधानसभा मतदार संघ हा मतदार संघ पुर्नरचनेत अनुसुचीत जातीसाठी राखीव ठेवण्यात आला.2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत या विधानसभा मतदार संघातून लक्ष्मणराव ढोबळे यांना उमेदवारी देण्यात आली.मात्र स्वाभिमानी बाण्याचे लक्ष्मणराव ढोबळे यांनी अनगरकरांचे वर्चस्व अमान्य करीत आपल्या पध्दतीने कारभार केला.त्यामुळे नाराज होत 2014 च्या निवडणुकीत अनगरकरांनी आ.रमेश कदम यांना मैदानात उतरवीले.मात्र आ.रमेश कदम यांनीही या निवडणूकीत विजय प्राप्त केल्यानंतर अनगकरांचे वर्चस्व झुगारत आपल्या पध्दतीने कारभार पाहण्यास सुरुवात केला.मोहोळ मतदार संघावर 12 वाडयाच्या माध्यमातून वर्चस्व अबाधीत ठेवण्याचा काळ संपला आहे हे ओळखत पंढरपूर तालुक्यातील 17 गावांवर राजकीय वर्चस्व निर्माण करावयाचे असेल तर भीमा सहकारी साखर कारखान्याची सुत्रे आपल्या हाती राहीले पाहीजेत हे ओळखून अनगरकरांकडून मोर्चेबाधणी करण्यात येवू लागली.मात्र 2011 मध्ये झालेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत खा.धनंजय महाडिक यांच्या हाती मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनीच सत्ता सोपवीली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.व ते मतदाानाच्या आकडेवारीवरुन निदर्शनास ही येते.
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे स्थापनेपासून जिल्हयाध्यक्ष पद भुषवीलेले मनोहरभाऊ डोंगरे हेही पुढे अनगरकरांच्या विरोधात गेले व ‘लोकशक्ती’च्या माध्यमातून आपले वेगळे अस्तित्व दाखविण्यात यशस्वी झाले.विजयराज डोंगरे यांनीही मोहोळ तालुक्याच्या राजकारणावर आपला वेगळा ठसा उमटवीला असून राष्ट्रवादी कॉग्रेसचे खासदार तथा भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक,विजयराज डोंगरे आणि आ.भारत भालके समर्थक कार्यकर्त्यांमध्ये बाळराजेंच्या पंढरीतील बैठकीनंतर अस्वस्थता निर्माण झाली असून आमचीही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विचारांवर श्रध्दा आहे.इतक्या वर्षात 17 गावातील राष्ट्रवादी समर्थकांची कधी आठवण झाली नाही.आणि आताचा हा पंढरपूरातील बैठकीचा फार्स हा केवळ 2019 च्या विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच केला गेला आहे.मात्र मोहोळ जि.प.व पंचायत समितीचा निकालाचे अवलोकन केल्यास जनतेच्या डोक्यात वेगळेच काही तरी आहे हे लक्षात येईल अशीच प्रतिक्रिया भीमा परिवार व लोकशक्ती परिवार तसेच 17 गावातील आ.भालके समर्थक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.