पंढरी वार्ता:- चला आपणच रुपया-रुपयाने आठ हजार गोळा करु अन् हे खड्डे बुजवू ! रेल्वे ओव्हरब्रीज खालच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कोळी युवक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बबलू बोराळकर शनिवारी करणार भीक मांगो आंदोलन !

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यानजिक असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रीज खालील रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना वाहनचालकांना विशेषत: दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागत असून हे खड्डे चुकवीताना अनेकवेळा छोटमोठे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे.तालुका पोलीस ठाण्याकडून खाली येताना ऐन वळणावरच हे खड्डे असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.त्यामुळे या ठिकाणच्या खड्डयाबाबत वाहनचालक प्रचंड नाराजी व्यक्त करीत असल्याचे दिसून येत असून या बाबत वृत्तपत्रातूनही बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत.या बातम्यांची दखल घेत प्रशासनाने तातडीने या रस्त्यावरील हे तीन-चार मोठ मोठे खड्डे बुजवीणे गरजेचे असताना त्या कडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कोळी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बबलू बोराळकर यांनी या बाबत अनोखे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून हे तीन ते चार खड्डे बुजविण्याच्या खर्चाचा अभ्यास करुन केवळ आठ हजार रुपये खर्च अपेक्षीत आहे हे लक्षात घेवुन ते शनिवार दिनांक 12 मे रोजी याच ओव्हर ब्रीजखाली भीक मांगो आंदोपलन करणार असून यातून जमा झालेल्या निधीतून आवश्यकता भासल्यास स्वत: खर्च करुन हे धोकादायक खड्डे बुजविणार असल्याची माहीती कोळी युवक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बबलू बोराळकर यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव