पंढरी वार्ता:- भीमा नदीला कालव्याचा दर्जा देण्यासाठी उग्र संघर्ष करू- आ.भारत भालके. सरकोली येथील शेतकरी मेळाव्यात दिला इशारा
उजनी धरणाच्या प्रकटीकरणात भीमा नदीत पाणी सोडण्याचा उल्लेखच नाही.ज्या शेतकर्यांनी जमीनी देवून उजनी धरणासाठी त्याग केला त्याच शेतकर्यांना उजनीच्या पाण्यापासून वंचीत ठेवणयचे पाप हे सरकार करीत आहे.हे सरकार नाकर्ते सरकार आहे.यातील मंत्र्याची तोंडे सुध्दा पाहू वाटत नाहीत असले लोक राज्याचा कारभार हाकत आहेत.मात्र आम्ही नदीकाठच्या शेतकर्यांवर अन्याय होऊ देणार नाही.या प्रकटीकरणात बदल करण्यात नाही आला तर उग्र संघर्ष करू आणि शेतकर्यांच्या उद्रेकानंतर होणार्या परिणामाची जबाबदारी शासनाची असेल असा इशारा आ.भारत भालके यांनी सरकोली येथे आयोजीत शेतकरी मेळाव्यात दिला आहे.या मेळाव्यास मा.केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे,मा.मुख्यममंत्री अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,आ.प्रणिती शिंदे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
