पंढरी वार्ता:- नारायण चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने हनुमंत देशमुख यांचा सत्कार ! जन्मभुमी आणि कर्मभुमीतील सत्काराने देशमुख भारावले.
सांगली जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगार भाऊ पाटील या गेल्या 7 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस जेरबंद दिल्याबद्दल नारायण चिंचोली येथील रहिवाशी पोलीस हवालदार हनुमंत देशमुख यांचा नारायण चिंचोली ग्रामस्थ,राजे ग्रुप बहुद्देशीय संस्था व पोलीस मित्र संघटना यांच्या वतीने मा.सरपंच विठ्ठल माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील मुळचे रहिवाशी असलेले हनुमंत देशमुख हे गेल्या काही वर्षापासून नारायण चिंचोली येथे वास्तव्यास आहेत.एक कर्तव्यकठोर पोलीस कर्मचारी म्हणून ते परिचीत आहेत.हनुमंत देशमुख यांनी कर्तव्य बजावताना यापुर्वीही अनेक सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात प्रशंसनिय भुमिका बजावली आहे.त्यांचा अतिशय उत्साहपुर्ण वातावरण सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी बाळासाहेब काळे प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी दिनकर खांडेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.या सत्कार सोहळयास नारायण चिंचोली,भैरवनाथ वाडी व ईश्वर वठार येथील ग्रामस्थ व युवा वर्ग मोठया संख्येने सहभागी झाला होता.
यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती लक्ष्मण धनवडे म्हणाले की,आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून सर्वसामान्य जनतेमध्ये आपल्या नम्रतेने आणि सहकार्य करण्याच्या वृत्तीने लोकप्रिय झालेल्या या पोलीस अधिकार्याचा सत्कार करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.हनुमंत देशमुख यांनी आपल्या गावाचा लौकीक वाढवला आहे.
या सत्कार सोहळ्यास दादाराजे देशमुख,दिनकर खांडेकर,नितिन मस्के,चेअरमन विष्णू माने,व्हा.चेअरमन धर्मराज नलवडे,ग्रामसेवक एच.एन.खवळे,भिमराव धुपे,संपत देशमुख,विजय कोळेकर,अभिजीत कवडे,सुनिल माने,श्रीधर कोळेकर,देवानंद लोंढे,भास्कर गुंड,ज्ञानेश्वर बरडे,शिवाजी वसेकर,सुभाष हिंगमीरे,आप्पा खांडेकर,आप्पा वाघमोडे,औदुंबर शेटे,नवनाथ नलवडे,मुकुंद घाडगे,शिवलिंग हिंगमीरे,संदीफ हिंगमीरे,रामहरी लोंढे,गोटू गाजरे,राजाभाऊ नलवडे,मारुती लवंड,ज्ञानेश्वर वाघमोडे,सचिन घाडगे,विजय पाटील,भाऊसाहेब माने,दिपक खरात,सहदेव कोले,साधू नलवडे आदी उपस्थित होते.