पंढरी वार्ता:- रेल्वे ओव्हरब्रीज खालील खड्डे बुजविण्यास सुरवात ! कोळी युवक महासंघाने दिला होता आंदोलनाचा इशारा.

येथील तालुका पोलीस ठाण्यालगत असलेल्या रेल्वे ब्रीज खालील ऐन वळणावर मोठ मोठे खड्डे पडल्याने दुचाकी चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत होती.व खड्डा चुकविण्याच्या नादात छोटया अपघाताच्या घटना घडत होत्या.या रस्त्यावर सातत्याने मोठी वर्दळ असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.या ठिकाणचे खड्डे तातडीने बुजवावेत अन्यथा भीक मांगो आंदोलन करुन हे खड्डे बुजवीले जातील असा इशारा कोळी युवक महासंघाने दिल्यानंतर आज पंढरपूर नगर पालीकेच्या वतीने तातडीने येथील खड्डे बजुविण्यास सुरुवात झाली आहे.
         या बाबत बोलताना कोळी युवक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बबलू बोराळकर म्हणाले की,येथील खड्डे बुजवावेत अशी मागणी आपण नगर पालीकेकडे निवेदनाद्वारे केली होती व आंदोलनाचा इशाराही दिला होता.मात्र सोमवारी हे खड्डे बुजविण्यात येतील असे आश्‍वासन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिले होते.आज येथील खड्डे बुजविण्यास प्रारंभ झाला असून त्याच बरोबर सरगम चौक येथील खड्डे बुजविण्यात येणार असल्याची माहीती देण्यात आली आहे.नगर पालीका प्रशासनाने आमच्या निवेदनाची दखल घेत तातडीने खड्डे बुजविण्यास सरुवात केल्याने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे अशी माहीती यावेळी त्यांनी दिली.  

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव