पंढरी वार्ता:- अंबाबाई ‘पटांगण’ नव्हे आता होणार ‘क्रिडांगण’ ! जिल्हाधिकार्यांचे नगर पालीका प्रशासनास पत्र. नगर पालीकेच्या लेखी आश्वासनानंतर शिवक्रांती संघटनेचे उपोषण मागे. क्रिडा शौकिन व पालकवर्गाकडून व्यक्त होत आहे समाधान.
पंढरपूर शहाराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावरच असलेले अंबाबाई पटांगण हे एकेकाळी या शहरातील नगर पालीका शिक्षण मंडळाच्या अखत्यारीतील अनेक शाळांचे अधिकृत क्रिडांगण म्हणून ओळखले जात होते.तर शहराच्या जवळपास निम्म्या लोकवस्तीतील मुले या पटांगणाचा वापर मैदानी खेळासाठी करीत होते.मात्र पुढे यात्राकालावधीत पंढरपूरात येणार्या भाविकांच्या वाहनांसाठी पार्कींंग स्थळ म्हणून या पटांगणाचा वापर करण्यात येवू लागला यातच भरीस भर म्हनून या पटांगणाच्या जागेत मोठया प्रमाणात अतिक्रमणे वाढत गेली हे 195 पासून तेे आतापर्यंतच्या सॅटेलाईट सर्व्हेतून निदर्शनास येते.1 लाख लोकवस्तीच्या या शहरात नगर पालीकेच्या मालकीचे सर्वसुविधा युक्त एकही क्रिडांगण नसल्याने क्रिडाप्रेमी नागरिक व पालकांच्या भावना लक्षात घेवून शिवक्रांती संघटनेने अंबाबाई पटांगण हे क्रिडांगण म्हणून विकसीत केले जावे यासाठी सातत्याने लोकशाही मार्गाने लढा दिला होता.नगर पालीकेसमोर भररस्त्यावर क्रिेकेट मॅचचे आयोजन करुन अनोखे आंदोलनही केले होते.
या आंदोलनाची दखल न घेतल्यास सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवक्रांती संघटनेच्या वतीने उपोषण केले जाईल असा इशाराही संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला होता.अखेर या आंदोलनास यश आले असून अंबाबाई पटांगणाच्या ठिकाणी नगर पालीकेच्या वतीने लवकरच क्रिडांगण म्हणून फलक लावण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन न.पा.प्रशासनाच्या वतीने देेण्यात आले आहे.अंबाबाई पटांगणाच्या ठिकाणी ‘क्रिडांगण’असा फलक नगर पालीका प्रशासनाकडून लावल्यात आल्यानंतर यात्रा कालावधी वगळता इतर वेळी हे पटांगण ‘नो पाकींग झोन’राहणार आहे व येथील अतिक्रमाणाबाबत ही योग्य ती कारवाई होणे अपेक्षीत आहे.
नगर पालीका प्रशासनाकडून याबाबत लेखी आश्वासनाचे पत्र देण्यात आल्यामुळे शिवक्रांती संघटनेने आजपासून करण्यात येणारे आमरण उपोषण मागे घेतले असून हे पत्र स्विकारताना शिवक्रांती संघटनेचे शहराध्यक्ष सागर चव्हाण,शहर कार्याध्यक्ष सोपानकाका देशमुख,विद्यार्थी आघाडी प्रमुख विकी झेंड,बाबा लगसकर यांच्यासह शिवक्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.