पंढरी वार्ता:- लाडू प्रसाद निविदा प्रश्नी राष्ट्रवादी युवक कॉग्रेेस आक्रमक ! शहराध्यक्ष संदीप मांडवे यांचा उग्र आंदोलनाचा इशारा.
आध्यात्माची दक्षिण काशी मानल्या जाणाजया पंढरीच्या श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भाविक येत असतात. या भाविकांना पांडुरंगाचा आवडता प्रसाद असणाजया बुंदीच्या लाडूचा प्रसाद सुविधापूर्वक मिळणेचे नियोजन करण्यात येत असते. याद्वारे दरवर्षी कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत असते. सध्या ई-टेंडरिंगकडून प्रसादाचा लाडू व त्यासाठी लागणारे पॅकेजिंग याचे नियोजन केले आहे. परंतु हे करण्यात आलेले नियोजन देण्यात आलेल्या ई-टेंडरिंगच्या पद्धतीप्रमाणे नसल्याने यावरती होत असलेला भाविकांचा देणगीरूपी पैशांचा खर्च अनाठायी होत आहे. त्यामुळे तो प्रसादाचा लाडू आणि त्याचे पॅकेजिंग ई-टेंडरिंगच्या पद्धतीनुसार करण्यात यावे. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष संदिप मांडवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंदिर समितीच्या वतीने प्रसादाच्या लाडवासाठी जे ई-टेंडरिंग केले होते, सध्या त्या पद्धतीने नाही. टेंडर झाल्यानंतर अटी बदलण्यात आल्याचे अधिकारी सांगत असून जरी अटी बदलल्या असल्यातरी बदलेल्या अटीनुसार पुन्हा ई-टेंडरिंग का केले नाही. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच यांमुळे जो अनाठायी खर्च होत आहे, तो भाविकांच्या देणगीतून होत असल्याने ती गोरगरीब जनतेची लूटच आहे.
यांमुळे भाविकांना योग्य प्रकारचा लाडू आणि त्याचे पॅकेजिंग मिळावे ही मागणी असून ही मागणी न झाल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
यापुर्वीही अशा अनेक बाबींमध्ये राष्ट्र्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने आवाज उठविण्यात आला होता. परंतु त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याने राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे.