पंढरी वार्ता:- मुस्लिम ऑल बॅकवर्ड संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अश्पाक भालदार यांची निवड. पंढरीत झालेल्या बैठकीत विविध पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर
मुस्लिम ऑल बॅकवर्ड संघटनेच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी अश्पाक भालदार यांची निवड करण्यात आली आहे.येथील शासकिय विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष बिलाल शेख,जिल्हा उपाध्यक्ष आदम मुजावर,लाला मुलाणी,माळशिरस तालुकाध्यक्षजुबेर दुरुगकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी अस्लम पठाण(पंढरपूर तालुका उपाध्यक्ष),सद्दाम नाडेवाले(शहर कार्याध्यक्ष),पीरसाहेब जमादार(जिल्हा कार्यकारीणी सदस्य) यांनाही निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष बिलाल शेख म्हणाले की,मुस्लिम समाजातील अर्थिक द्रष्टया मागासवर्गिय तसेच ओबीसी जमातींना जातीचे दाखले मिळण्यात वारंवार अडचणी येत आहेत.त्याच बरोबर शिक्षण हक्क कायद्यानुसार मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाबाबतही अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.अर्थिक द्रष्टया मुस्लिम समाज हा अतिशय दुर्बल असून रोजच्या व्यवसायावर गुजराण करणारा आहे.विविध योजनांचा आणि सवलतींचा लाभ समाज बांधवांना मिळावा यासाठी संघटनेच्या पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहीले पाहीजे.
या बैठकीस शहराध्यक्ष इम्रार तांबोळी,हमीद पठाण,राहुल डोंगरे,शफीक चाचा,नगरसेवक डि.राज सर्वगोड,वीर शेख,समीर मुजावर,फिरोज भालदार,दादासाहेब मुजावर,सैफन मुजावर,मकसूद कमलीवाले,अमीन इनामदार,अक्रम मुजावर,सलीम मुजावर,हिरालाल मुजावर,विलास थोरात,मुजमील कमलीवाले,निहाल मुलाणी,युनूस भालदार,हुसेन पठाण आदी उपस्थित होते.