पंढरी वार्ता:- पंढरपूर नगर पालीका व अन्न भेसळ विभागाच्या वतीने कॅन्सरग्रस्त रुग्णांना अर्थिक मदत करा. शहीद टिपू सुलतान युवक संघटनेची निवेदनाद्वारे मागणी
राज्य शासनाने गुटखा व सुगंधी तंबाखू विक्रीवर बंदी घातल्यानंतरही पंढरपूर शहर व तालुक्यात मोठया प्रमाणात गुटखा विक्री केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.कॅन्सर सारख्या जिवघेण्या व वेदनादायी आजारास कारणीभूत ठरणार्या गुटख्यामुळे अनेकजण या आजारास बळी पडत आहे.गुटखा बंदीच्या अंमलबजावणीतील अपयश लक्षात घेवून अन्न विभागाने व नगर पालीकेने कॅन्सर ग्रस्त रुग्णांना अर्थिक मदत करावी अशी मागणी शहीद टिपू सुलतान युवक संघटना व सामाजिक परिर्वन विचार मंचच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहीती देताना शहराध्यक्ष जमीर तांबोळी म्हणाले की,पंढरपूर शहर व तालुक्यात सर्रास चोरून गुटखा विक्री केली जात आहे.गुटखा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यास येथील अधिकारी अक्षम्य हलगर्जीपणा करीत आहेत.या बाबत अन्न विभागाचे पंढरपूर शहर निरिक्षक विनायक शेटे यांच्याकडे लेखी अथवा तोंडी तक्रार केली असता‘मी लवकरच सेवानिवृत्त होणार आहे,मला टेन्शन देवू नका असे सांगत असताना दिसून येतात.तर तालुका अन्न निरिक्षक केव्हातरी सोलापूरातून येवून तपासणीचा फार्स पुर्ण करतात.त्यामुळे चोरून गुटखा विक्री करणार्यांना सुगीचे दिवस आले आहेत.कॅन्सर सारख्या आजाराचे कारण ठरणार्या गुटख्याबाबत जो बोटचेपे धोरण अवलंबले जात आहे.त्याचा निषेध करीत जागतिक कर्करोग दिनाच्या पाश्वभुमीवर आम्ही निवदेना ही मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन देताना सामाजिक परिर्वन विचार मंचचे संस्थापक प्रा.सुदर्शन मसुरे,महादेव नवगीरे,रोशन मसुरे,जमीर तांबोळी,देवानंद इरकल,तानाजी घोटकर,दत्ता झरकर आदी उपस्थित होते.