पंढरी वार्ता:- पेट्रोल,डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पंढरीत राष्ट्रवादीचा बैलगाडी मोर्चा ..तर जनताच सरकारच्या विरोधात हातात आसूड घेईल ! - राजूबापू पाटील
पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने आज येेथील प्रांतकार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.शासनाने इंधनाच्या किमतीवर तातडीने नियंत्रणात आणाव्यात,इंधनाचे दर वाढल्याने जिवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहे.ही परिस्थीती तात्काळ नियंत्रणात न आणल्यास जनतेच्या संतपाचा ऊद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही व राष्ट्रवादी कॉग्रेस उग्र आंदोलन छेडेल अशा आशयाचे निवेदन येथील प्रांतअधिकारी कार्यालयात देण्यात आले.
या मोर्चाच्या समारोप प्रसंगी बोलताना राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील म्हणाले की,रोज सकाळी झोपेतून उठताच सामान्य जनतेला इंधन दरवाढीचा सामना करावा लागत आहे. गेंडयाच्या कातडीचे हे सरकार मात्र अच्छे दिनाचे कौतुक सांगण्यात व्यस्त आहे.या सरकारचा निषेध म्हणून आज बैलगाडी मोर्चा काढत आहोत,मात्र आमच्या सहनशिलतेचा शासनाने अंत पाहू नये कदाचित उद्या शासनाविरोधात जनताच आसूड घेवून बाहेर पडेल असा इशारा राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील यांनी दिला.नोटबंदी आणि जीएसटीने सामान्य जनतेचे आधीच कंबरडे मोडलेले असताना आता इंधन दरवाढीने जगणे असह्य केले असल्याचेही यावेळी त्यांनी सांगीतले.
या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील,पंढरपूर-मंगळवेढा मतदार संंघाचे अध्यक्ष दिपक वाडदेकर,विद्यार्थी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मारुती जाधव,डॉक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.अमरजीत गोडसे,बाळासाहेब पाटील,औदुंबर गायकवाड,युवराज भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या मोर्चास प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत माने,शहराध्यक्ष सुधीर भोसले,जिल्हा सरचिटणीस दिगंबर सुडके,तालुका कार्याध्यक्ष हनुमंत पवार,ज्येष्ठ नागरिक तालुकाध्यक्ष महादेव पाटील,किसान सभा तालुकाध्यक्ष कृष्णात माळी,युवक जिल्हा सरचिटणीस प्रशांत घोडके,मनोज आदलींगे,अनिल सप्ताळ,अजय जाधव,संदीप गाजरे,सुरज पेंडाल,गुरुराज अभंगराव,महंमद मुलाणी,शंकर शिंदे नाईक,मारुती भिंगारे,सचिन कदम,गुलाब मुलाणी,रशीद शेख,शाहरुक मुलाणी,गिरीष चाकोते,गणेश चव्हाण,डॉक्टर सेलचे संदीप शेंडगे,ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा साधना राऊत,शहराध्यक्ष रंजना हजारे,मनिषा राऊत,हेमलता पांढरमीसे यांच्यासह राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.