पंढरी वार्ता:-धान्य पुरवठा ठेकेदाराच्या विरोधात आ.गणपतराव देशमुखांचा नाराजीचा सूर ! आ.बबनदादा शिंदे व आ.भारत भालके यांनीही विधानसभेत उठविला होता आवाज ठेकेदाराच्या मनमानीमुळे हजारो कटुुंबे स्वस्त धान्यापासून वंचीत
जिल्यातील स्वस्त धान्य दुकांनांना वाहतुक ठेकेदाराकडून सुरळीतपणे धान्य पुरवठा होत नसल्याने सर्वसामान्य कुटुंबे स्वस्त धान्यापासून वंचीर रहात असून अनेक वेळा चालू महिन्याचा माल स्वस्त धान्य दुकाना पर्यंत पोहोचण्यास महीना अखेरचा कालावधीत उजाडत असल्याने महिन्याच्या सुरुवातीस हाती आलेली तुटपुंज्या पगाराची रक्कम संपून गेल्याने अनेक कुटुंबाना स्वस्थ धान्य दुकानातील धान्य खरेदीस मुकावे लागत आहे.धान्य पुरवठादार ठेकेदाराच्या मनमानी विरोधात नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.बबनदादा शिंदे व आ.भारत भालके यांनी आवाज उठवला होता व संबधीत धान्य पुरवठा ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली होती.आता आ.गणपतराव देशमुख यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अन्न व नागरी पुरवठा मंत्र्याची भेट घेवून आपण हा गंभीर प्रकार त्यांच्या समोर मांडणार आहोत असे स्पष्ट केले आहे.
आ.बबनदादा शिंदे व आ.भारत भालके यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर या बाबत धान्य पुरवठा ठेकेदाराकडून खुलासा मागविण्यात आला आहे व विलंबाबत कारवाई करण्यात येत आहे असे आश्वासन ना.गिरिष बापट यांनी दिले होते.मात्र आता पुन्हा याबाबत ज्येष्ठ आ.गणपतराव देशमुख यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर तरी जिल्हाधिकारी याची दखल घेणार का असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

