पंढरी वार्ता:- जुन्या कोर्टाच्या जागेचा सुदुपयोग व्हावा, नागरिकांमधून व्यक्त करीत होत आहे अपेक्षा ! सहकार न्यायालय,कामगार न्यायालय,धर्मदाय सह.आयुक्त कार्यालय,कौटुंबीक न्यायालयासाठी या ठिकाणी भव्य इमारत उभारण्यात यावी-ऍड.राजेश भादुले
पंढरी वार्ता विशेष:-
गेल्या जवळपास 80 वर्षापासून पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक फौजदारी व दिवाणी खटल्यांची सुणावनी करत अनेक कठोर निकाल देत पंढरपूरकरांच्या मनात एक भितीयुक्त आदराचे स्थान प्राप्त केलेल्या शहरातील जुन्या कोर्टाची इमारत गेली चार वर्षे धुळखात पडून आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात,अतिशय मोक्याच्या ठिकाणची ही जागा नक्की कुणाची याचीही उत्सुकता नागरिकांना लागली आहे.अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सद्या प्रगतीपथावर असून या रुंदीकरणात ही जुन्या कोर्टाची बरीचशी जागा संपादन होणार आहे.त्यामुळे सद्या येथे बाधीत क्षेत्र सोडून कंपाउंड वॉल बांधण्यात येत आहे तर येथील बाररुमही पाडण्यात येत आहे.
ऍड.भाऊसाहेब काणे,ऍड.मा.आ.नारायणराव पटवर्धन,मा.नगराध्यक्ष ऍड.भगवानराव भादुले ऍड.रामभाऊ ताठे,ऍड.मामासाहेब काणे,ऍड.विनायक वेळापुरे, ऍड.यादगीरी,ऍड.कोंडेजकर, ऍड.राजाभाउ पटवर्धन आदी पंढरीतील एकेकाळच्या दिग्गज वकीलांचा वावर या कोर्टात असायचा.पंढरीतील अनेक गाजलेल्या खून खटल्यांची सुानवणी जेव्हा या इमारतीत होत असे तेव्हा भीषण शांततेत वाद-प्रतिवाद करणार्या या दिग्गज वकिलांचा आवाज अगदी बाहेर रस्त्यापर्यंत जायचा.या रस्त्यावरुन येणारा-जाणारा प्रत्येकजण या कोर्टाच्या आवारात उत्सुकतेने डोकावून पहात असल्याचे एकेकाळी निदर्शनास येत होते.मात्र गेल्या चार वर्षापासून ही इमारत अक्षरश: धुळखात पडली असून आता रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे चर्चेत आली आहे.
या बाबत पंढरी वार्ताशी बोलताना ऍड.राजेश भादुले म्हणाले की,जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नव्या सुसज्ज इमारतीमुळे जुनी कोर्ट इमारत सद्या वापरात नाही मात्र या जागेत सहकार न्यायालय,कामगार न्यायालय,कौटुंबीक विवाद न्यायालय,सह.धर्मदाय आयुक्त कार्यालय आदींसाठी सुसज्ज इमारत उभारावी अशी आमची मागणी आहे.लवकरच या बाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा असून तसे झाल्यास पंढरपूर विभागातील तालुक्यातील सर्वच उपरोक्त विषयांबाबतचे खटले येथे चालविले जातील.त्यामुळे नागरिकांनाही सोलापूर वार्या कराव्या लागणार नाहीत.