पंढरी वार्ता:- सुशिलकुमार शिंदेचे मौन तर खा.विजयसिंह मोहीते-पाटील यांची आक्रमक भुमिका ! भीमा नदी काठच्या शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी पालकमंत्रीही प्रयत्नशील ?

सोलापूर शहरासाठी स्मार्ट सिटी योजनेबरोबरच अमृत योजनेसही आता मंजूरी मिळाली असून या योजनेअर्तंगत सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून सोडण्यात येणारे पाणी बंद करुन त्या ऐवजी आता  उजनीच्या पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या हेतूने अमृत योजनेद्वारे उजनी धरण ते सोलापूर या समांतर पाईपलाईन साठी जवळपास 439 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे.या घोषणेनंतर सोलापूर शहर भाजपासाठी सरकारच्या उपलब्धीचा भाग म्हणून आणखी एक प्रचाराचा मुद्दा उपलब्ध झाला असला तरी सोलापूर शहरासह संपुर्ण जिल्हयाची तहान भागेल या आशेने उजनी धरणासाठी आपल्या जमीनी दिलेल्या जिल्ह्यातील ग्रामिण जनतेमध्ये विशेषत: नदीकाठच्या रहिवाशांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.समांतर जलवाहीनीमुळे उजनीतून भीमा नदीत सोडली जाणारे आवर्तने रद्द केली जाणार असल्याच्या चर्चेने भीमा नदीकाठ अस्वस्थ असून याविरोधात प्रचंड संतप्त भावना व्यक्त होत आहेत.या बाबत खा.विजयसिंह मोहीते-पाटील यांनीही नुकतीच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.लोकभावना लक्षाथ घेवून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजयसिंह देशमुख यांनी या बाबत मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार असल्याचे सुतोवाच केले आहे.मात्र बर्‍याच दिवसांनी पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याच्या धावत्या दौर्‍यावर आलेले सुशिलकुमार शिंदे यांची याबाबत भुमिका अजूनही गुलदस्त्यात असल्याचेच दिसून आले आहे.
            सुशिलकुमार शिंदे यांची सोलापूर शहरावरच विशेष मर्जी असल्याची भावना सोलापूर लोकसभा मतदार संघातील जनतेची झाली होती व त्यास तसे समर्पक दाखलेही दिले जात होते.सुशिलकुमार शिंदे यांनी आपल्या सत्ताकाळात फक्त आणि फक्त सोलापूर शहर व परिसरातच मोठ मोठे प्रकल्प मंजूर करुन आणले तर मतदार संघातील इतर तालुक्यातील जनतेचे मते मिळविण्यासाठी मात्र स्थानिक नेत्यांना गोंजारून मताधिक्क्य कसे पदरात पाडून घेता येईल यासाठीच प्रयत्नशील असल्याचा आरोप नेहमीच होत आला आहे.
    आता समातंर जलवाहीनीच्या मंजुरीनंतर भीमा नदीकाठच्या शेतकर्‍यांसाठी सुशिलुमार शिंदे काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे या भागातील जनतेचे लक्ष लागले आहे.     

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव