पंढरी वार्ता:- पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या वतीने पंढरीत भारत बचाओ जनआंदोलन !
राज्यातील शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या,राष्ट्रीयकृत बँकाची बडया उद्योगपतींनी मोठया प्रमाणात कर्जे थकविल्यामुळे वाढलेला एनपीए,दररोज होत असलेली पेट्रोल डिझेलची दरवाढ,वाढती महागाई,बेरोजगारांची वाढती संख्या,भ्रष्टाचार व संवीधान बदलण्याचा प्रयत्न यामुळे या सरकारच्या विरोधात देशभरात असलेल्या विरोध प्रकट करण्याच्या हेतूने आज पंढरीत युवक कॉगे्रसच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी चौक येथे भारत बचाओ जनआंदोलन करुन शासनाचा निषेध करण्यात आला.
या बाबत बोलताना पंढरपूर शहर युवक कॉग्रेसचे अध्यक्ष अमित डोंबे म्हणाले की,देशभरात या सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष असून सामान्य नागरिकांना अच्छे दिनाचे अमिष दाखवून सत्ता संपादन केल्यानंंतर या सरकारने केवळ काही मोजक्या बडया उद्योगपतींचे हित जोपासण्याचे काम केले आहे.देशात बेरोजगारी वाढत असताना,सामान्य जनता इंधन दरवाढीमुळे वाढलेल्या महागाईत पिचून जात असतानाही गेंडयाच्या कातडीचे हे सरकार नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे.देशभरात या सरकारचा निषेध करण्यासाठी कॉग्रेसच्या वतीने भारत बचाओ जनआंदोलन करण्यात येत आहे.याचाच एक म्हणून आज पढंरपूर शहर युवक कॉग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी पंढरपूर शहर कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष ऍड.राजेश भादुले,प्रा.डोळ सर,बाबा लगसकर,श्रीकांत लिगाडे,आकाश पवार,अमित अवघडे,अभिषेक शहा,मधुकर फलटणकर,वैभव वाडकर,अक्षय घोंगडे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.