पंढरी वार्ता:- गोपाळपूरच्या सरपंचपदी परिचारक गटाच्या विजया जगताप यांची निवड नाटयमय घडामोडीत परिचारक गटाची सरशी !
![]() |
| कॅप्शन जोडा |
गोपाळपूर ग्रामपंचायतीमध्ये एकुण 15 सदस्य असून 9 महिला तर 6 पुरुष सदस्य आहेत.गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सर्व राजकीय गटांनी एकत्र येत आघाडी करुन निवडणूक लढविण्यात आली होती.व आ.भालके गटाच्या विमल शिवाजी आसबे यांना अडीच वर्षे कालावधीसाठी सरपंच पदाची संधी देण्याचे सर्वानुमते ठरले होते.मात्र हा कालावधी पुर्ण झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजुर करण्यात आला होता.या नंतर सरपंच पदाच्या निवडणूकीत लक्ष घालत आ.भालके गटाकडून काहीही करुन गोपाळपूर ग्रामपंचायतीवर आपल्याच गटाचा सरपंच झाला पाहीजे यासाठी नाटयमय घडामोडी घडल्याचे दिसून आले आहे.यातुनच प्रियंका पवार या परिचारक गटाच्या सदस्यास आ.भालके गटाकडून सरपंचपदाची उमेदवारी देण्यात आली.त्यामुळे गोपाळपुरच्या सरपंचपदाच्या निवडणूकीत आ.प्रशांत परिचारक यांनी लक्ष घालून सुत्रे हलविल्यामुळेच या ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
या निवडीसाठी नगरसेवक वामन बंदपट्टे,ज्येष्ठ नेते दिलीप गुरव व ग्रामविकास आघाडीचे अध्यक्ष प्रा.सुभाष मस्के यांनी राजकीय मुत्सद्दीपणा दाखवीत 15 ग्रा.प.सदस्यांपैकी प्रशांत जाधव,शांताराम गुरव, उपसरपंच उज्वला बनसोडे, विजया जगताप,रेश्मा लेंगरे, काशिबाई पिसे,जनाबाई मस्के, शितल आळसंदे,रेखा देवमारे यांनी परिचारक गटाचे उमेदवार विजया जगताप यांचा या विजयात मोलाचा वाटा आहे.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री भडंगे यांनी तर सह.निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेविका ज्योती पाटील, तलाठी श्री गायकवाड यांनी काम पाहीले.या निवडीच्या वेेळी सह.पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे,तालुका पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे हे पोलीस पथकासह उपस्थित होते.
या निवडीसाठी विठ्ठल जगताप, राजू लेंगरे,दत्तात्रय गुरव, अरुण बनसोडे,विठ्ठल बंदपट्टे, विलास मस्के,सुभाष पवार पाटील,भुषण गुरव,आनंद मगदूम, राजू पिसे,पिंटू पवार ,दत्तात्रय लेंगरे गुरुजी, बाबासो मस्के, नागनाथ बनसोडे, परमेश्वर आळसंदे, भीमा देवमारे,ज्ञानेश्वर मस्के, उमेश अधटराव,रवी गुरव, सतिश लेंगरे,चंदाताई तिवाडी, भैय्या कदम,नितिन सुरवसे, धनंजय क्षिरसागर,गणेश शिरगीरे,गोपाळ लेंगरे,विठ्ठल लेंगरे,अर्जुन बनसोडे,संतोष लेंगरे, भुषण माने, पांडुरंग कुरे, विकास गुरव, गोविंद लेंगरे, विष्णूतात्या बनसोडे, संभाजी शेजाळ, सुरेश लेंगरे,उध्दव गुरव, मनोज गुरव, सचिन गुरव,बालाजी गुरव,सचिन गुरव, लक्ष्मण मस्के,बबलू मस्के,दत्तात्रय मस्के, दत्तात्रय बनसोडे,गणेश भानवसे,मंगेश देशपांडे, पांडुरंग शिंदे,सुखदेव डांगे,दादा सुडके, सचिन जाधव,नितिन मेटकरी, आबा मेटकरी,नवनाथ लेंगरे, भैय्या गडदे,बबलू भोसले, तानाजी जाधव,पांडुरंग भानवसे, राकेश माने,विकास गुरव, विठ्ठल माने,संजय माने, मोहन लेंगरे,राहुल देवमारे, गणपत बनसोडे,नितिन देवमारे, बाळासाहेब सर्वगोड, बापू कांबळे, पिंटू कुंचे,मारुती गवळी, सतिश मस्के,नवनाथ मस्के,अतूल मस्के,बाळासाहेब मस्के,दिपक सुरवसे,बबलू सावंत आदींनी परिश्रम घेतले अशी माहीती आघाडीचे अध्यक्ष सुभाष मस्के यांनी दिली.

