पंढरी वार्ता:-कॉग्रेेस ओबीसी सेलने तहसिल कार्यालयासमोरील अपघातास कारणीभूत ठरणार्या ‘त्या’ रस्ता दुभाजकावर लावला रिफ्लेक्टर ! गुरुवारी रात्री पुन्हा एका कारचालकाची या रस्तादुभाजकास धडक
येथील तहसिल कार्यालयासमोरुन रस्त्याच्या मधोमध सुरु होणारा हा रस्ता दुभाजक अनेकवेळा अपघातास कारणीभूत ठरला आहे.या ठिकाणी रात्रीच्या वेळी असलेले अंधाराचे साम्राज्य येथूनच सुरु होत असलेला या फूटभर उंचीच्या रस्ता दुभाजकामुळे या ठिकाणी कायम अपघात होत असलेले दिसून येतात.या रस्त्यावर प्रबोधनकार ठाकरे चौक ते तहसिल कार्यालय या रस्त्यावर रस्ता दुभाजक करताना प्रबोधनकार ठाकरे चौक ते जुना कराड नाका इथपर्यंत रस्ता दुभाजकाची रचना व उंची सहज द्रष्टीपथात येण्यासारखी आहे.मात्र येथून पुढे तहसिल कार्यालयापर्यंत हा रस्ता दुभाजक केवळ फूटभर उंचीचा असून हा बदल करण्याचे कारण मात्र आजतागायत गुलदस्त्यात आहे.
गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास या रस्ता दुभाजकावर एक कार थेट जावून आदळली आणि पाठीमागून येणार्या अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांना आपली वाहने नियंत्रीत करताना फार मोठी कसरत करावी लागली होती.नागरिकांनी प्रयत्नाची शिकस्त करीत रस्ता दुभाजकावर चढलेली कार मागे ढकलून आतील प्रवाशांना बाहेर काढले होते.या घटनेनंतर सोशल मिडीयावर पुन्हा एकदा या अपघातास कारणीभूत ठरणार्या रस्ता दुभाजकाबाबत प्रचंड टिकाटिपण्णी होऊ लागली होती.याची दखल घेत आज कॉग्रेस ओबीसी सेलने पुढाकार घेवून या ठिकाणी स्वखर्चाने रिफ्लेक्टर बसवीले आहेत.
यावेळी कॉग्रेसचे शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले,ओबीसी सेलचे शहराध्यक्ष मधुकर फलटणकर,युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष अमित डोंबे,प्रा.डोळ सर,सचिव अमित अवघडे,युवक कॉग्रेसचे माजी शहराध्यक्ष शंकर सुरवसे,युवक कॉग्रेसचे उपाध्यक्ष अभिषेक शहा,विजय मेटकरी,राजू देवकर,बालाजी देशमाने,ॠषी पोरे,राजू माने,तानाजी भोसले,निलेश ढाळे,आकाश खटकाळे,एकनाथ वाघमारे,संतोष खिलारे आदी उपस्थित होते.