पंढरी वार्ता:- अनिधिकृत बांधकाम केलेल्या मालमत्तांचा खरेदी-विक्री दस्त नोंदविण्यास प्रतिबंध ! बेकायदा बांधकामाची यादी नगर पालीकेने तात्काळ प्रसिध्द करण्याचे नगर विकास विभागाचे आदेश. बेकायदा बांधकामाकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल होणार.

 बेकायदेशीर बांधकामांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थाना नागरी सुविधा पुरविण्यात मोठा अडथळा निर्माण होत असल्याने शहरांची अवस्था बकाल होत आहे.अनधिकृत बांधकामे व अनधिकृतरित्या गुंठेवारी करुन प्लॉटजागांची खरेदी-विक्री केली जात असल्याने या भागातील पाणी पुरवठा,रस्ते,गटारी आदी सुविधा देेताना नगर पालीका प्रशासनास अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे वाढत्या बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने आता आणखी कठोर उपायोजना करण्याचा निर्णय घेत 3 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार नगर पालीकेने अशा बेकायदेशीर बांधकामांची यादी आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी त्याच बरोबर वृत्तपत्रातून शहरातील बेकायदा बांधकामांची माहीती द्यावी असे आदेश शासनाच्या नगर विकास विभागाने दिले आहेत.
         शासनाच्या या आदेशानुसार आता नगर पालीकेने वार्डनिहाय बेकायदा बांधकामांची यादी दुय्यम निबंधकांंकडे तात्काळ सादर करणे बंधनकारक असून दुय्यम निबंधकांनी बेकायदा बांधकाम असलेल्या स्थावर मालमत्तांची तसेच अनधिकृत प्लॉट जागांचे खरेदी-विक्री दस्त नोेंदवून  घेवू नयेत असे आदेश देण्यात आले आहेत.या आदेशातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्या अधिकार्‍याच्या कार्यकक्षेत बेकायदा बांधकाम सुरु असेल अशा अधिकार्‍यावर 2 मार्च 2009 च्या बेकायदा बांधकाम प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव