पंढरी वार्ता:-हुतात्मा स्मारकाशेजारील ध्वजस्तंभास टेकूनच केले जाते मद्यपान ! आ.रामहरी रुपनर यांनी विधानपरिषदेत केली होती तक्रार, तरीही परिस्थीती जैसे थे !

पंढरीत भर वर्दळीच्या रस्त्यावर केले जणारे मद्यपान हा कायम टिकेचा विषय ठरला असून यामुळे तिर्थक्षेत्र पंढरीची प्रतिमा मलिन होत आहे.त्यामुळेच वारकारी पाईक संघाच्या निवेदनाची दखल घेत विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीनेही या बाबत ठराव केला होता. पंढरीत उघडयावर मद्यापन करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात मोठया प्रमाणात दृष्टीस पडत असतानाच रात्रीच्या वेळी येथील जिजामाता उद्यानातील हुतात्मा स्तंभाशेजारील ध्वजस्तंभास टेकुन मद्यपान केले जात असल्याने नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
     पंढरीतील हुतात्मा स्मृतीस्तंभाच्या परिसरात मद्यप्राशन केले जात असल्याची तक्रार आ.रामहरी रुपनर यांनी थेट विधानपरिषदेत केली होती.व या बाबत तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली होती.या बाबत पंढरी वार्ताने सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केले होते.त्यानंतर काही काळ हा प्रकार थांबलेला असतानाच आता पुन्हा येथे तरुणांचे टोळकी रात्री मद्यपान करीत बसल्याने आढळून येत आहे.आपण ज्या ठिकाणी बसून मद्यपान करीत आहोत ती जागा देशासाठी बलीदान दिलेल्या हुतात्म्यांच्या पवित्र स्मृती जपत आहे.व ज्या ध्वजस्तंभास टेकून मद्यपान करीत आहोत तेथे या देशाचा तिरंगा फडकावला जातो याचे तरी भान या मद्यपींनी ठेवावे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.  

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव