पंढरी वार्ता:- ऊस दर,दुध दर,उजनीचे पाणी वाटप प्रकटीकरण,शेतकर्यांची रखडलेली कर्जमाफी अन् विजबीलासाठी उतरवलेले डि.पी.! सरकोलीच्या शेतकरी मेळाव्यात सुशिलकुमार शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी शेतकरी उत्सुक !
सोलापूर-मंगळवेढा मतदार संघाचे पाच वर्षे प्रतिनिधीत्व केलेले कॉग्रेसचे मा.खा.सुशिलकुमार शिंदे यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सरकोली तालुका पंढरपूर येथे आयोजीत शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत खा.ऍड.शरद बनसोडे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर गेली चार वर्षे पंढरपूर-मंगळवेढा व मोहोळ तालुक्यात केवळ एखाद्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहात असलेले सुशिलकुमार शिंदे हे आता पक्ष कार्यकर्त्यांच्या व शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा सक्रिय झाले असल्याची चर्चा या भागातील मतदारांमधून होत असतानाच सरकोली येथील शेतकरी मेळाव्यात ऊसाच्या एफआरपीचा प्रश्न,दुधाची नाकारलेली दरवाढ,कर्जमाफीच्या लाभापासून वंचीत राहीलेले शेतकरी,शेतकर्यांच्याजिवन मरणाचा प्रश्न असलेल्या उजनी धरणाच्या पाणी वाटप प्रकटीकरणाचा प्रश्न,सोलापूर शहरासाठी अमृत योजना मंजूर झाल्यानंतर भीमा नदीकाठच्या शेतकर्यांवर कोसळणारे संभाव्य जलसंकट,वीज बील भरले नाही म्हणून उतरवीले जाणारे डि.पी.आदी प्रश्नावर आक्रमकपणे काय बोलणार ? याकडे पंढरपूर तालुक्यातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
मतदार संघ पुर्नरचनेपुर्वी सोलापुर हा स्वतंत्र लोकसभा मतदार संघ होता.सोलापूर शहराच्या विकासासाठी सुशिलकुमार शिंदे यांनी फार मोठे योगदान दिले आहे.मतदार संघ पुर्नरचनेनंतर 2009 ते 2014 या कालावधीत सुशिलकुमार शिंदे यांनी पंढरपूर-मंगळवेढा व मोहोळ तालुक्याचेही लोसभेत प्रतिनिधीत्व केले.याच कालावधीत त्यांनी चार हजार कोटींचा एन.टी.पी.सी.पॉवर प्रोजेक्ट,बोरामणी आंतराष्ट्रीय विमानतळ,पुणे -हैद्राबाद रस्ता चौपदरीकरण,भारत फोर्ज प्रकल्प,कुंभारी एम.आय.डी.सी,केंद्रीय पोलीस दल प्रशिक्षण केंद्र आदी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सोलापूर शहर व परिसरात आणले होते.मात्र त्याच वेळी सोलापूर लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या इतर तालुक्याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले होते अशीच धारणा या तालुक्यातील मतदारांमध्ये निर्माण झाली होती.व त्यामुळे त्यांना 2014 च्या निवडणूकीत पराभव पत्कारावा लागला होता.
2014 च्या पराभवाचा बोध घेवून सुशिलकुमार शिंदे हे आता आक्रमकपणे ग्रामिण जनतेचे प्रश्न मांडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच या मतदार सघंातील जनतेला सुशिलकुमार शिंदे यांचे दर्शन दुर्मिळ झाले होते.अधून मधून त्यांच्या सोलापूर दौर्याच्या बातम्या यायच्या तर पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील एखाद्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थितीत असायची.मात्र नुकत्याच अनवली येथे झालेल्या कॉग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंंतर सरकोली येथे थेट शेतकरी मेळाव्यात सुशिलकुमार शिंदे मार्गदर्शन करणार असल्याने ते शेतकर्यांच्या वरील प्रश्नांवर काय भुमिका मांडणार व गेल्या चार वर्षात झालेल्या दुर्लक्षाबद्दल काय स्पष्टीकरण देणार याकडे ग्रामिण मतदारांचे लक्ष लागले आहे.