पंढरी वार्ता:- अजिंक्य स्पोर्ट ऍकडमीच्या खेळाडूंची भारतीय सैन्य दलात निवड. सलमान मुलाणी, किरण चव्हाण, मिलिंद भोसले ,समाधान थोरात, राहुल गाजरे यांचा युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांचे हस्ते सत्कार.
श्री शिवछत्रपती स्टेडीअम साताय येथे झालेल्या सैन्य भरती प्रक्रियेत अजिंक्य स्पोर्ट ऍकडमी च्या पाच खेळाडू ची सैन्य दलात निवड झाली आहे. या सर्व नव सौनिकाचा सत्कार युटोपियन चे चेअरमन उमेश परिचारक याच्या हस्ते करण्यात आला देश सेवेचा ध्यास मनी घेतलेल्या सलमान मुलाणी, किरण चव्हाण, मिलिंद भोसले ,समाधान थोरात, राहुल गाजरे, या नवसौनिकाचा सन्मान या वेळी करण्यात आला.
यावेळी बोलताना उमेश परिचारक म्हणाले की, यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. सर्व तरूणांनी न डगमगता पोलीस व सैन्य दलात भरती होऊन देशासेवा करावी असे आव्हान त्यांनी केले.छोटस रोपट पंतनगर येथे लावलेले आहे त्याच लवकरच वटवृक्ष व्हावी आशी इच्छा त्यांनी व्यक्त केली सैन्यदला मध्ये समाविष्ट होण्यासाठी खुप मेहनेत घ्यावी लागते. त्याच पद्धतीने आमच्या ऍकडमीचे प्रशिक्षक सराव करून घेतात. प्रशिक्षक चेतन धनवडे यांनी अत्यंत खडतर सराव करून घेतल्या मुळे सैन्य दलात प्रशिक्षणाची आता कसलची भिती उरली नसल्याचे मत किरण चव्हाण यांनी व्यक्त केले
. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन कल्याणराव काळे स्पोर्ट क्लब वाडेकुरोली मधील सहा खेळाडूची निवड राज्य खो-खो संघात झाल्या बद्दल खेळाडूचा व क्रीडाशिक्षक सचिव संतोष पाटील सरांचा सत्कार ऍकडमीच्या वतिने उमेश परिचारक यांच्या हास्ते करण्यात आला .सैन्य दलात भरती झालेले सर्व खेळाडू अजिंक्य स्पोर्ट ऍकडमीचे कार्याध्यक्ष प्रा सुभाष मस्के सर, प्रशिक्षक सचिव चेतन धनवडे सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होते. या कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक गजेंद्र पवार सर, मुकंद कर्वे, नागनाथ क्षिरसागर सर, अविनाश कदम सर ,प्रा.गणेश बागल, रामचंद्र भोसले गुरूजी, विद्याधर भोसले गुरुजी ,प्रा.संतोष पाटील सर, प्रा.समाधान काळे सर, पंढरपूर तालुक्यातील सर्व क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते कार्यक्रम सुत्रसंचालन अविनाश कदम यांनी केले तर जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक गजेंद्र पवार सर यांनी आभार मानले.