पंढरी वार्ता:- 2 जुलै मंदीर समितीच्या वर्षपुर्ती दिनी सदस्यांच्या विशेष आढावा बैठकीचे आयोजन करावे ! पंढरपूरकांकडून व्यक्त होत आहे अपेक्षा वर्षभरातील मंजूर ठराव आणि अंमलबजावणी याचा लेखाजोखा ऐकण्यासाठी पंढरपूरकर उत्सुक
पंढरी वार्ता:- 2 जुलै मंदीर समितीच्या वर्षपुर्ती दिनी सदस्यांच्या विशेष आढावा बैठकीचे आयोजन करावे !
पंढरपूरकांकडून व्यक्त होत आहे अपेक्षा
वर्षभरातील मंजूर ठराव आणि अंमलबजावणी याचा लेखाजोखा ऐकण्यासाठी पंढरपूरकर उत्सुक
गतवर्षी 2 जुलै 2017 रोजी आषाढ शुध्द नवमी दिवशी आकस्मातपणे मुख्यमंत्री देवेद्र फडण
वीस यांनी मंदीर समितीची घोषणा करुन आश्चर्याचा धक्का दिला होता.तर कराडच्या राजकारणात बीजेपीचे कमळ हाती धरुन निवडणूक लढवित पराभूत झालेल्या डॉ.अतुल भोसले यांना समितीचे अध्यक्षपद देवून प.महाराष्ट्रात भाजपाच्या अस्तित्वाच्या लढाईला बळ देण्याचा प्रयत्न केला होता.मात्र स्थापनेच्या घोषणेनंतर वारकरी फडकरी दिंडी समाज सघंटनेने थेट माउलीचा रथ कर्मवीर औदुंबराराव पाटील चौकात थांबवत या समितीस आपला विरोध दर्शविला होता.हा विरोध हा पदाच्या लालसेपोटी होता याची चर्चा तेव्हाही झाली होती आणि पुढे सहअध्यक्षपद,वाढीव सदस्य व सल्लगार समिती सदस्यांच्या निवडीवेळी ते प्रतीतही झाले होते.मात्र तरीही पंढपूरकरांनी हे सारे बदल स्विकारत केवळ ही स्थायी मंदीर समिती आता ठोस निर्णय घेईल व पंढरपूरात समितच्या माध्यमातून अनेक विकास कामे करीत शिर्डी,तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूराची महती वाढवेल अशी अपेक्षाही व्यक्त झाली होती.या स्थायी मंदीर समितीच्या स्थापनेस आता 2 जुलै रोजी एक वर्ष पुर्ण होत असून या दिवशी मंदीर समितीने संत तुकाराम भवन येथे एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करावे व समितीच्या स्थापनेनंतर झालेल्या प्रत्येक बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची व घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी काय उपाययोजना केली याची पंढरपूरकरांना व प्रसिध्दी माध्यमांना माहीती द्यावी अशी अपेक्षाव्यक्त केली जात आहे. येत्या आषाढी यात्रेच्या पाश्वभुमीवर नुकतीच पालकमंत्र्याच्या उपस्थितीत एक आढावा बैठक संपन्न झाली असून ही बैठक नव्हे तर एक फार्स होता अशीच प्रतिक्रिया नंतर व्यक्त झाली आहे.
सावळया विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत आल्यांनतर प्रसाद म्हणून येथील चुरमुरे,लाहया,साखर फुटाणे,बत्ताशे गावाकडे घेवून जाणार्या भाविकांना तिरुपतीच्या धर्तीवर लाडू प्रसाद वाटपाचा निर्णय स्व.बाळासाहेब भारदे हे अध्यक्ष असताना घेण्यात आला.भाविकांनीही हा बदल आनंदाने स्विकारत लाडू प्रसाद विक्रीस उदंड प्रतिसाद दिला मात्र गतवर्षी स्थापन झालेल्या या स्थायी मंदीर समितीच्या एक वर्षातील वाटचालीत सर्वात दुखद व धक्कादायक घटना म्हणजे विठ्ठलाच्या प्रसादात विष कालवले जाणार असल्याचा दस्तुरखुद्द ठेकेदारानेच केलेला आरोप.या आरोपाच्या गदारोळातच समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देवून मुख्यमंत्र्यांनही कराड निवासी त्यांचे राजकीय वजन वाढविण्याचा ठोस प्रयत्न केला असला तरी शासनाच्या या निर्णयानंतर पंढरपूरकर आता समितीकडे अधिक अपेक्षेने पाहू लागले आहेत.
येत्या 2 जुलै रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे सर्व सदस्य,सल्लगार मंडळाचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत समितीची एक बैठक व्हावी.या बैठकीत वर्षभरात घेण्यात आलेले विविध निर्णय,मंजूर करण्यात आलेले विविध ठराव आणि त्यांच्या अंमलबजावीबाबत काय ठोस उपायोजना केल्या गेल्या यावरच फक्त चर्चा व्हावी.किती ठरावांची अंमलबजावणी प्रत्यक्षात समितीने केली याचा अभ्यास व्हावा आणि त्यानंतर संत तुकाराम भवन येथे एका सार्वजनिक आढावा बैठकीचे समितीने आयोजन करुन पंढरपूरकरांना आमंत्रीत करुन याचा लेखा जोखा मांडावा अशी अपेक्षा पंढरपूरकरांकडून व्यक्त होत आहे.