पंढरी वार्ता :- पिराची कुरोली येथे कृषीदुतांचे स्वागत
पिराची कुरोली येथे कृषीदुतांचे स्वागत
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संचलित शिक्षण प्रसारक मंडळ, अकलुज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांचे पंढरपूर तालुक्यातील म ौजे पिराची कुरोली येथे आगमन झाले. रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या अंतर्भत ग्रामीण कृषी कार्यानुभव हा सहा महिन्याच्या कालावधीसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये विविध पिकांची प्रात्यक्षिके, माती परिक्षण, जनावरांचे लसीकरण, शेतकरी समुह गट-चर्चा, सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. बाळासाहेब कौलगे-पाटील यांनी भुषविले होते. सरपंच कुलदिप कौलगे- पाटील, ग्रामसेवक मारुती भोसले, प्रतिष्ठित व्यक्ती आजी- माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. मान्यवरांनी कृषीदुतांना मोलाचे मार्गदर्शन व कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन केले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे मा. डॉ. डी. पी. कोरटकर, मा. प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी मा. प्रा. एस. एम. एकतपुरे व प्रा. एस. आर. आडत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषीदुत ओंकार गायकवाड, सुदर्शन सुतार, राकेश शिंदे, सुरज गुंड, सागर पवार, तेजस मोहिते, साहील कोठारी, महेश सुर्यवंशी, सृजन पुट्टा आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.