पंढरी वार्ता:- हज यात्रींना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातील पहीला कॅम्प पंढरपूरात संपन्न

यावर्षीच्या हजयात्रेसाठी जाणार्या सोलापूर जिल्ह्यातील हजयात्रींसाठी पहीला मार्गदर्शन मेळावा हज तरबीयत कॅम्प पंढरपूर येथील स्टेशन मस्जिद येथे नुकताच संपन्न झाला.या मेळाव्यात हाजी उस्मान यांनी संपुर्ण हज यात्रा कशा पध्दतीने करयाची व कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावयाची याचे संपुर्ण मार्गदर्शन यावेळी हजयात्रेसाठी रवाना होणार्या मुस्लिम बांधवांना करण्यात आले.यावर्षीच्या हज यात्रेस पंढरपूर शहरातून प्रथमच 72 इतक्या मोठया
संख्येने यात्री हजला जाणार आहेत.ही पंढरपूरकरांसाठी अतिशय सुखद बाब आहे असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी हाजी युनुस शेख,हाजी सुभेदार साहेब,हाजी मेहबुब बेद्रेकर,हाजी फय्याज बागवान,ऍड.यासीन शेख,अ.माजीद मौलाना,एम.इब्राहीम,मुन्ना आतार,मुश्ताक नाडेवाले,अ.समद बेद्रेकर,युसुफ मुजावर,इक्बाल मोगल,इक्रम बागवान,कमर व पंढरपूर शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील हज यात्रेकरुनांना हज येथे आल्यांनंतर योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी भारत सरकारच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्यांमध्ये पंढरपूर येथील सोहेल बेद्रेकर यांची निवड झाली आहे.ते तीन महीने तेथे राहून प्रशिक्षण घेवून यात्रेसाठी आलेल्यांना मार्गदर्शन करणार आहेत.त्यांची निवड झाल्याबद्दल यावेळी पंढरी वार्ता परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पहा या बातमीचा vdo