पंढरी वार्ता:- नामदेव भुईटे खुन प्रकरणाची सीआयडी चौकशी करा - शुभांगी भुईटे मुख्यमंत्र्याना घेराव घालण्याचा विविध संघटनांचा इशारा

पंढरी वार्ता:- नामदेव भुईटे खुन प्रकरणाची सीआयडी चौकशी करा - शुभांगी भुईटे
मुख्यमंत्र्याना घेराव घालण्याचा विविध संघटनांचा इशारा 

पहा शुभांगी भुईटे पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या (vdo )



नामदेव भुईटे खुन  प्रकरणात सद्या केवळ एकच आरोपी अटकेत आहे.सदर आरोपीची सखोल चौकशी केल्यास यातील खरे आरोपी समोर येतील.या मागणीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांचीही भेट घेवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली तर मिरज येथील पोलीस खात्यातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटून विनंती केली मात्र मला केवळ तपास सुरु आहे एवढेच जुजबी उत्तर दिले जाते.त्यामुळे या खुन प्रकरणाचा तपास सीआडीकडे सोपविण्यात यावा अशी मागणी मा.नगरसेवक स्व.नामदेव भुईटे यांच्या पत्नी शुभांगी भुईटे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.
                आज येथील पत्रकार भवन येथे आयोजीत पत्रकार परिषदच्या माध्यमातून शुभांगी भुईटे यांनी पंढरपूरातील विविध सामाजिक संघटना,पक्ष संघटना यांना आपल्या पाठीशी राहण्याचे आवाहन करीत या खुन प्रकरणाचा तपास सीआडी कडे सोपविल्या शिवाय यातील मुख्य सुत्रधार पुढे येणार नाही.सद्या सुुर असलेल्या तपासाबाबत आम्ही असमाधानी आहोत.राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आषाढी एकादशी निमित्त पंढरीत येणार असून आमच्या या मागणीची दखल त्यांनी तात्काळ न घेतल्यास त्यांना घेराव घालून व सीआडीकडे तपास सोपविण्याचा निर्णय जाहीर केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

        यावेळी मराठा महासंघाचे अर्जुन चव्हाण यांनी नामदेव भुईटे खुन प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता सर्व संघटना एकत्र येवून शुभांगी भुईटे यांंच्या या लढयात सहभागी होऊ.मुख्यमंत्र्यांना या मागणीची दखल घ्यावीच लागेल.अन्यथा त्यांना उग्र आंदोलनास सामोेरे जावे लागेल. 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव