पंढरी वार्ता:- अजिंक्य स्पोर्टस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड आ.प्रशांत परिचारक यांच्याहस्ते सत्कार
पंढरी वार्ता:- अजिंक्य स्पोर्टस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवडआ.प्रशांत परिचारक यांच्याहस्ते सत्कार
अजिंक्य स्पोर्टस् अकॅडमीच्या पंतनगर येथील प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी
नी सारिका गटकुल यांची पोलीस उपनिरिक्षकपदी तर समाधान ज्ञानू नवले व रजत चंद्रकांत चव्हाण यांची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नी सारिका गटकुल यांची पोलीस उपनिरिक्षकपदी तर समाधान ज्ञानू नवले व रजत चंद्रकांत चव्हाण यांची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आ.प्रशांत परिचारक म्हणाले की,पंतनगर पंढरपूर येथे अजिंक्य स्पोर्टस् अकॅडमीच्या वतीने ग्रामिण भागातील सैन्य दलात,पोलीस खात्यात,रेल्वे पोलीस,सीमा सुरक्षा दल,केंद्रीय व राज्य राखीव पोलीस तसेच इतरही महत्वपुर्ण खात्यात भरती होण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व पुर्वतयारीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.शारीरीक चाचणीसाठी आवश्यक अशा क्रिडांगणाची व्यवस्था करण्यात आली आहे.व तज्ञ अनुभवी प्रशिक्षक येथे मार्गदर्शन करीत आहेत.त्याचा तरुणांनी लाभ घ्यावा.आज या अकॅडमीचे हे विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत याचा आम्हास अभिमान वाटतो.
पंतनगर येथील या अजिंक्य स्पोर्टस् अकॅडमीत युटोपीयन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष प्रा.सुभाष मस्के,सचिव व प्रशिक्षक चेतन धनवडे हे खेळाडू विद्यार्थांना भरतीपुर्व प्रशिक्षण देत आहेत.
