पंढरी वार्ता:- खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल प्रशालेत वृक्षारोपण शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणचा उपक्रम

 खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल प्रशालेत वृक्षारोपणशरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणचा उपक्रम


संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठानच्या वतीने विठ्ठल प्रशाला वेणुनगर येथे प्रशालेतील विद्यार्थीनींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्रतिष्ठाणचे जिल्हा कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक गणेश गोडसे,जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह लाटे,प्रशालेचे प्राचार्य एस.एन.घोगरदर यांच्या प्रमुख उपस्थिीत हा उपक्रम राबविण्यात आला.खा.सुप्रियाताई या आमच्यासाठी आदर्श आहेत.त्यांच्या महिलांच्या प्रबोधनाचे आणि महिलांना संधी देण्याचे कार्य आमच्यासाठी आदर्शवत आहे त्यामुळे आम्ही आज लावलेल्या या रोपट्यांची जिवापाड जोपासना करणारा असल्याचे यावेळी विद्यार्थीनींनी सांगीतले.
                    यावेळी नवनाथ चव्हाण,सोमनाथ ढवण,बालाजी खंदारे,प्रकाश मोरे,विनायक पवार,हणुमंत चव्हाण,भरत खरात,परमेश्‍वर शेजाळ,विलास कवडे,पवार सर,कमठाणकर सर,गोडसे सर,पोपट नागटिळक,नाना कवडे तसेच प्रशालेतील शिक्षकवृंद,कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव