पंढरी वार्ता :-नारायण चिंचोली येथे लांब पल्ल्याच्या एसटी बसेसना थांबा देण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन पुरातन तीर्थक्षेत्र असूनही लांब पल्ल्याची एस.टी.थांबत नसल्याने होती नाराजी
नारायण चिंचोली येथे लांब पल्ल्याच्या एसटी बसेसना थांबा देण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन
पुरातन तीर्थक्षेत्र असूनही लांब पल्ल्याची एस.टी.थांबत नसल्याने होती नाराजी
नारायण चिंचोली येथे लांब पल्ल्याच्या एसटी बसेसना थांबा देण्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन नारायण चिंचोली :- पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे सुर्य नारायणचे पुरातन हेमाडपंती मंदिर आहे हे मंदिर भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असून या ठिकाणी दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे परिवहन विभागाच्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या थांबा देण्याची मागणी नारायण चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे लेखी निवेदन देऊन करण्यात आली दिवाकर रावते हे आषाढी याञेनिमित्त सुरू असलेल्या कामानिमित्ताने पंढरीत आले असता नारायण चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने त्याच्याकडे या ठिकाणी होत असलेली प्रवाशी भाविकांची हाल अपेक्षटा मांडून नारायण चिंचोली येथे सर्व लांब पल्ल्याच्या एसटी बसेसना थांबा देण्याची मागणी केली या मागणीची दखल घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते व एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांनी नारायण चिंचोली येथे सर्व लांब पल्ल्याच्या एसटी बस थांबवण्यात याव्यात अशा सूचना सोलापूर जिल्हा विभाग नियंत्रक यांना दिल्या यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर सरपंच प्रतिनिधी पोपट पाटील मारूती वाघमोडे आदी उपस्थित होते
