पंढरी वार्ता :- पंढरपुरातील कोकण विदर्भ बँकेत चोरी लॅपटॉपसह ४३ हजारांचा मुद्देमाल लंपास
पंढरी वार्ता :- पंढरपुरातील कोकण विदर्भ बँकेत चोरी
लॅपटॉपसह ४३ हजारांचा मुद्देमाल लंपास
लॅपटॉपसह ४३ हजारांचा मुद्देमाल लंपास
पंढरपुर येथील संत तनपुरे महाराज मठासमोर असणाऱ्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून चोरटयांनी 43500/- रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे . ही घटना दि 21/06 /18 रोजी रात्री 8 ते दुसऱ्या दिवशी दि 22/06रोजी 9:30 च्या दरम्यान घडली.विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून चोरी झालेची फिर्याद अरुण लिबाजी कदम वय वर्ष 55 रा मनीषा नगर पंढरपूर यांनी पंढरपुर शहर पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेचे लोखंडी शटर चा कोयंडा तोडून आत मध्ये प्रवेश केला .व येथून 17000/- किमती टॅब , एक विप्रो कंपनीचा लॅपटॉप 26500/- पिसीआर कंपनीचा लॅपटॉप सोबत जिपीएस कॅमेरा या वस्तू अज्ञात चोरट्याने वस्तू चोरून नेल्याची तक्रार पंढरपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे . पुढील तपास पो. नि यांच्या आदेशानव्ये पो. हे. कॉ . उबाळे हे करत आहेत .