पंढरी वार्ता:- रमाई घरकुल योजनेच्या अनुदानासाठी समाजकल्याणमंत्री बडोले यांना निवेदन ...अन्यथा उग्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही-नगरसेवक डि.राज सर्वगोड
पंढरी वार्ता:- रमाई घरकुल योजनेच्या अनुदानासाठी समाजकल्याणमंत्री बडोले यांना निवेदन
...अन्यथा उग्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही-नगरसेवक डि.राज सर्वगोड
पंढरपूर शहरातील 274 व मंगळवेढा शहरातील 14 नवबौध्द व दलीत कुटुबांना रमाई आवास घरकूल योजनेअंतर्गत शासनाने सात कोटी एकवीस लाख रूपये अनुदान तात्काळ उपलब्ध करावे या मागणीचे निवेदन नगरसेवक डि .राज सर्वगोड व दुर्योधन यादव यांनी राज्याचे समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना मुबंई येथे दिले आहे.
या बाबत पंढरी वार्ताशी बोतलाना नगरसेवक डि.राज सर्वगोड म्हणाले की, हे अनुदान उपलब्ध न झाल्याने 288 घरकुल लाभार्थ्यांना हक्काच्या पक्क्या घरापासून वंचीत रहावे लागत आहे. या बाबत प्रशासकिय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नाही.यापुर्वी 4 जून रोजी पुणे विभागीय आयुक्त यांना देखील या घरकूलांचे अनुदान उपलब्ध करुन द्यावे अशा आशयाचे निवेदन दिले होते. मात्र याची दखल घेतली गेली नाही.केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनाही याच आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.राज्याचे समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी याबाबत त्वरीत कार्यवाही केली जाईल असे अश्वासन दिले आहे.पुढील एक महिन्यात याबाबत कार्यवाही न झाल्यास वंचीत लाभार्थ्यांना सोबत घेवून उग्र आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.