पंढरी वार्ता:- म्हैसाळचे पाणी जुलै महिन्यात मंगळवेढा तालुक्यात -आ.भारत भालके शिरनांदगी तलावातील पाण्याचा होणार तालुक्याला फायदा
पंढरी वार्ता:- पंतनगर येथे आंतराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंढरीत विविध संस्थांच्या वतीने येथील पंतनगर येथे एकदिवसीय योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.
21 जून जगभरात योग दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमिवर पंढरीतील नागरिकांना शास्त्रशुध्द योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, अजिंक्य स्पोटर्स अकॅडमी पंतनगर, पंढरपूर योग विद्याधाम, पांडुरंग परिवार व विठ्ठल रूक्मिणी योग प्राणायाम यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर एक दिवसाच्या योग शिबीरामध्ये पंढरपूर मधील विविध भागातून मान्यवर नागरीक सहभागी झालेले होते.
एक दिवसीय योग शिबीर याचे उद्घाटन माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेश परिचारक, योग प्रशिक्षक अशोक
ननवरे, तालुका क्रीडा अधिकारी आमसिध्द सोलनकर, सुनिल वाळुजकर, प्रशांत आगावणे, सुभाष मस्के आदींसह आजी माजी नगरसेवक व विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अशोक ननवरे यांनी, उपस्थित नागरीकांना प्रात्यक्षिकांसह योगासनामधील आसनांची माहिती दिली. सर्व स्त्री पुरूषांना करण्यास अत्यंत सोपी परंतु शरीर व मन स्वस्थ राहण्यासाठी सर्वाधिक उपयोगी आसनांचा यामध्ये समावेश होता. शिबिरास महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी बोलताना उमेश परिचारक यांनी, लवकरच प्राणायाम शिबीर देखील आयोजित करण्यात येणार असल्याचा मानस व्यक्त केला.
प्राणायाम शिबीराचे नियमित आयोजन करण्याचा मानस-उमेश परिचारक