पंढरी वार्ता :- उपनगरातील भुयारी गटार योजनेसह पाणीपुरवठा व रस्त्यांची कामे मार्गी लावणार – आमदार प्रशांतराव परिचारक
उपनगरातील भुयारी गटार योजनेसह पाणीपुरवठा व रस्त्यांची कामे
मार्गी लावणार – आमदार प्रशांतराव परिचारक
मार्गी लावणार – आमदार प्रशांतराव परिचारक
पंढरपूर नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्र.१४ मध्ये माझ घरकुल लागालँड पाठीमागे तळे परिसर, प्रशांतराव परिचारक नगर येथे भुयारी गटार टप्पा क्र.३ च्या कामाचा शुभारंभ आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, सतिष मुळे, पांडुरंग घंटी, खादी भांडारचे अध्यक्ष नागेश शिंगण सर, माजी नगरसेवक तुकाराम (आप्पा) राऊत, ग्राहक मंचाचे अध्यक्ष शंकर (अण्णा) ऐतवाडकर, माजी नगरसेवक संजय अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी उपनगरातील नागरिकांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असुन या भागात भुयारी गटार योजनेचे काम पुर्ण झाल्यानंतर इसबावी येथील पाण्याच्या टाकीवरुन या भागात नविन पाईपलाईन टाकुन पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगितले. तसेच या भागातील सर्व रस्ते, खडीकरण व डांबरीकरण करण्यात येतील असे आश्वासन यावेळी दिले व शहरात चालु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा त्यांनी नागरीकांसमोर मांडला.
यावेळी या प्रभागाचे नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, नगरसेविका अर्चना रानगट, नगरसेवक नरसिंह शिंगण, तसेच गटनेते अनिल अभंगराव, शिक्षण समिती सभापती विवेक परदेशी, नगरसेवक संजय निंबाळकर, सुनिलदादा पाटील, गुरुकुलचे प्राचार्य लक्ष्मण शिंगाडे, धर्मराज घोडके, सचिन शिंदे, नवनाथ रानगट,अमोल डोके, सचिन शिंदे, पाणीपुरवठा अभियंता आत्ताराम जाधव, प्रितम येळे, मोहन आरस, अनिल कदम व नागरीक मोठ्या संख्येन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत सतिष श्रीखंडे यांनी केले.