पंढरी वार्ता:- हिंदू मंदीरांच्या अधिग्रहणा विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचे पंढरीत आंदोलन
हिंदू मंदीरांच्या अधिग्रहणा विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचे पंढरीत आंदोलन
(पहा आंदोलनाचा एक्सक्लुसिव्ह vdo )
देशात व राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर अल्पसंख्यांकाना कॉंग्रेस काळात मिळणार्या विशेष सवलती व् संरक्षण हे हिंदुनाही मिळेल अशी अपेक्षा हिंदुत्ववाद्यांकडून व्यक्त केली जात होती.मात्र हे सरकार हिंदू धर्मियांच्या भावना दुखावत असून हिंदू धर्मीयांचीच मंदीरे ताब्यात घेत आहे.या घटनेचा निषेध म्हणून आज हिंदुत्ववादी संघटनांनी शासनाच्या प्रतिकात्म पुतळ्यास फासावर लटकवण्याचा प्रयत्न येथील छत्रपती शिवाजी येथे केला.मात्र पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करीत हा पुतळा ताब्यात घेतला.
या बाबत पंढरी वार्ताशी बोलताना हिंदू महासभेचे बाळसाहेब डिंगरे म्हणाले की,मंदिरे’ ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत. सहस्रो वर्षांपासून हिंदु संस्कृतीचे रक्षण, जतन आणि संवर्धन यांत मंदिरांची भूमिका अनन्यसाधारण आहे. प्रत्येक हिंदू स्वतःच्या सर्व विवंचना देवाला सांगून त्याचे मन मोकळे करतो आणि देवच अडचणीतून सोडवील’, या श्रद्धेमुळे त्याच्या जीवन जगण्याच्या आशा पल्लवित होत रहातात. अशा प्रकारे मंदिरांमुळे हिंदूंना मानसिकदृष्ट्या आधार तर मिळतोच आणि ती आध्यात्मिकदृष्ट्याही चैतन्य देऊन आपल्याला लाभ करून देतात. या चैतन्यामुळेच कोणताही दृश्य स्वरूपातील लाभ नसतांना लक्षावधी हिंदू प्रतिदिन मंदिरे किंवा तीर्थक्षेत्रे यांकडे खेचली जातात.ते काय आपलेच आहेत जातात कुठे ? असा पक्का अभ्यास करून शासनाने हे पाऊल उचलले आहे यात काही शंका नाही. मंदिरातील भ्रष्टाचाराचे कारण पुढे करून ताब्यात घेतली म्हणाव तर सरकारीकरण झालेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुळजा भवानी मंदिर, महालक्ष्मी मंदिर यात भ्रष्टाचार सुरुच आहे तो आधी शासनाने रोखावा.आंध्रप्रदेश, राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये सरसकट सर्वच देवळांचे सरकारीकरण झाले आहे. केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र यांसारख्या राज्यांमध्ये काही विशिष्ट प्रसिद्ध आणि ऐश्वर्यसंपन्न देवस्थानांचेे शासनाने विशेष कायदा करून सरकारीकरण केले आहे. काही राज्यांत देवळांसाठी शासनाचा एक वेगळा विभाग किंवा वेगळा मंत्रीच असतो. राज्यातील देवळे शासनाच्या त्या खात्याच्या आणि मंत्र्याच्या नियंत्रणात येतात. या प्रशासकीय दायित्वाचा लाभ राज्यकर्त्यांकडून अत्यंत दुर्दैवी पद्धतीने घेतला जातो. मंदिरांचे सरकारीकरण झाले की, धर्मद्रोही आणि भ्रष्ट नेते मंदिरांचे विश्वस्त बनतात. तसेच भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्यांकडे मंदिरांचे दायित्व दिले जाते.त्यामुळेच आमचा या सरकारच्या या मंदीरांच्या सरकारीकरणास विरोध आहे.
