पंढरी वार्ता:- प्लॅस्टिक बंदीतून बहुराष्ट्रीय कंपन्यांना सूट तर किरकोळ व्यापार्‍यांवर अन्याय - संतोष भिंगे प्लॅस्टिक बंदीबाबत पंढरीत प्रचंड असंतोष !

प्लॅस्टिक बंदीतून बहुराष्ट्रीय कंपन्यांना सूट तर किरकोळ व्यापार्‍यांवर अन्याय - संतोष भिंगे
प्लॅस्टिक बंदीबाबत पंढरीत प्रचंड असंतोष !

कालपासून महराष्ट्रात लागू झालेल्या प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीत बहुराष्ट्रीय  कंपन्यांना सूट देवून सर्वसामान्य व किरकोळ व्यापार्‍यांना टार्गेट केले जात आहे.बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यंाच्या बॅ्रन्डेड उत्पादनासाठी वापरलेल्या प्लॅस्टीक वेष्टणास सूट आणि छोटे विक्रेते,सामान्य व्यापारी,किरणा दुकानदार यांच्यावर कारवाई ही प्लॅस्टीक बंदी कायद्याच्या तरतुदी मधील विसंगतीच  स्पष्ट होत आहे. वास्तविक पाहता प्लॅस्टीक कचर्‍यामध्ये पाण्याच्या बाटल्यांचे प्रमाण सर्वाधीक आहे.मात्र त्यावर बंदी नाही ही बाब खटकणारी आहे.आता किरकोळ किराणा विक्रेेत्यांना कागदातूनच पॅकींग करुन विक्री करावी लागणार असल्याने कागदाची मागणी वाढल्याने वृक्षतोड होऊन पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे.याचा विचार शासनाने केलेला दिसत नाही अशी प्रतिक्रिया पंढरी वार्ताशी बोलताना पंढरीतील व्यापारी संतोष भिंगे यांनी व्यक्त केली आहे.
      पंढरपूर शहरात प्लॅस्टीक बंदीच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली असून कॅरीबॅग बरोबरच विविध वस्तुंच्या वेस्टनासाठी वापरलेल्या प्लॅस्टीक पिशव्यांचा समावेश बंदीत असून त्यामुळे रेडिमेड गारमेंटस्,कापड विके्रतेे,किराणा विक्रेते प्रचंड पेचात सापडले आहेत.वस्तुंवरील प्लॅस्टीकचे आवरण काढून टाकले तर धुळीमुळे वस्तू खराब झाल्यास ग्राहक घेणार नाही आणि प्लॅस्टीक आवरण वापरल्यास कारवाईची भीती यामुळे व्यापारी वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. शासनास खर्‍या अर्थाने पर्यावरणाची हानी रोखायची असेल तर सर्वाधीक कचर्‍रा निर्माण करणार्‍या पाण्याच्या बाटल्या आणि कॅरीबॅग यांच्यावर बंदीची आधी कठोर अंमलबजावणी करावी त्यानंतर पर्यावरणाची हानी होणार नाही अशा पध्दतीचा पॅकींगचा पर्याय पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्यावा असेही यावेळी संतोष भिंगे म्हणाले.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव